सतीश जमदाडे ।आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : आर्थिक व्यवहार करीत असताना चिल्लरची मोठ्या प्रमाणावर गरज भासते. त्यामुळेच व्यवहार करणे शक्य होत असते. मात्र चिल्लर दहा रूपयांचे नाणे बँकेत व व्यवहारात अनेक जण स्वीकारत नसल्याने चिल्लर नाण्यांचे वांदेच झालेले दिसून येत आहे.अनेक लहान बालकांना व महिलांना नाणे गोळा करण्याचा छंद आहे. मात्र गोळा केलेले नाणे बँकेत जमा करण्यासाठी किंवा व्यवहारात उपयोगात आणले स्वीकारले जात नसल्याने अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
बँकेत दहा रूपयाचे नाणे घेण्यास नकार
ग्रामीण भागातील नागरिक संभ्रमातदहा रूपयाचे नवीन नाणे असल्याने लोकांना आकर्षण वाटत आहे. अनेकांनी दहा रूपयाचे नाणे जमा केले आहेत. आता मात्र ते व्यवहारात कुणीही स्वीकारत नसल्याने व बँकेत सुद्धा घेत नसल्याने दहाचे नाणे बंद झाले की काय, असा संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र दहा रूपयाचे नाणे अद्याप बंद झालेले नाही.
दुकानदारांची कुचंबणाव्यवहारात दुकानदारांकडे मोठ्या प्रमाणावर नाणे जमा होतात ग्राहकांना देण्याससुद्धा भासते. परंतु, दहा रूपयाचे नाणे ग्राहक घेत नसल्याने ते सुद्धा दहाचे नाणे नाकारत आहेत. एरव्ही त्यांना चिल्लर नाण्याची गरज असायची. मात्र बँकेत व व्यापारी सुद्धा घेत नसल्याने दुकानदारही दहाचे नाणे नकार देत आहेत.दहा रुपयांचे नाणे हे व्यवहारात असताना, या नाण्यांच्या बाबतीत ग्राहकांमध्ये संभ्रम आहे. हे नाणे ग्राहक तसेच काही राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये स्वीकारले जात नाही. आम्ही स्वीकारतो, मात्र ग्राहक टाळाटाळ करतात. व्यवहारात अडचणी येत आहेत.- रोशन आस्वले, दुकानदार, खर्डी