ठळक मुद्देनिवेदन : चंद्रपूर बचाव संघर्ष समिती
लोकमत
न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरातील रस्त्यांचे बांधकाम करणारे कंत्राटदार आणि अभियंत्यांची नावे, मोबाईल क्रमांकाचा उल्लेख असणारे फलक त्या रस्त्यावर लावावे, या मागणीसह विविध समस्यांना घेऊन चंद्रपूर बचाव संघर्ष समितीतर्फे आयुक्तांना निवेदन देण्यात आले. दरम्यान आयुक्तांंनी समस्या सोडविण्याचे आश्वसन समितीला दिले. सदर निवेदनात पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवावी, पाणी बचतीसाठी पाइपलाइन लिकेज दुरूस्त करावे, रस्त्यावरील बंद पथदिव्यांसाठी हेल्पलाइन क्रमांक सुरू करावा, सिटीझन चार्टरची व्यापक अंमलबजावणी करावी, शहरातील रस्त्याचे बांधकाम करणारे ठेकेदार आणि अभियंत्यांची नावे मोबाईल क्रमांकाचा उल्लेख असणारे फलक त्या रस्त्यावर लावावे, रेन वॉटर हार्वेस्टिंगची मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी, वाढती लोकसंख्या लक्षात घेता सिटी बस सुरू करावी, यांचा समावेश आहे. यावर मनपा आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला व लवकरच मागण्या मार्गी लावू, असे सांगितले. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात चंद्रपूर बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. गोपाल मुंधडा, उपाध्यक्ष विजय चंदावार, पप्पु देशमुख, महासचिव मधुसूदन रूंगठा, दत्ताप्रसन्न महादानी, नगरसेवक राजू गोलीवार, राहुल घोटेकर, डॉ. किरण देशपांडे, डॉ. सपना दास महेंद्र राळे, स्वप्निल राजूरकर, सुबोध कासुलकर, कपिल उसगावकर, दिनेश जुमडे, अनुप यादव महेश उचके, सूरज पेंदुलवार, शिशिर हलदार यांच्यासह चंद्रपूर बचाव संघर्ष समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.