झाले आहे. राज्य शासनाने शाळेतील चतुर्थश्रेणी पदे रद्द करून शिपाई भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय तात्काळ रद्द करण्याची मागणी करीत शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष मोरेश्वर वासेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नेरी येथील लोक विद्यालयाच्या प्रांगणामध्ये शासन निर्णयाची होळी करण्यात आली. तसेच राज्य शासनाचा धिक्कार करण्यात येऊन शासन विरोधात नारेबाजी करण्यात आली. शासनानेच नेमलेल्या आकृतिबंध समितीने सुचवलेल्या सुचनाच्या विरोधात हा निर्णय आहे. त्यामुळे शासनाने हा निर्णय मागे घेतला नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा गंभीर इशारा संघटनाच्या वतीने देण्यांत आला आहे. राज्य शासनाने 05 पासूनअध्यादेश काडून आकृतिबंध च्या नावाखाली चतुर्थश्रेणी कर्मचार्याची भरती बंद ठेवली आहे. प्रलंबित मागण्यासाठी अनेक वेळा मोर्चे आंदोलने केली. अनेक वेळा सरकारसोबत चर्चा करून कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचे मागणी केली. राज्यातील अनेक शाळेमधील शिक्षकेत्तर कर्मचार्याची पदेमागील अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. सरकार सकारात्मक निर्णय घेईल व नियमित नियुक्ती करेल या आशावादावर गेल्या १५ वर्षांपासून चतुर्थ श्रेणी पदावर सेवक म्हणून कार्य करीत आहेत. परंतु शासनाकडून तोंडाला पाने पुसली जात आहे.
नेरी येथे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 4:53 AM