शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अंभोरे यांनी पप्पू देशमुख यांना दुपारी १ वाजता चर्चेसाठी बोलावले. शासकीय रुग्णालयाच्या नोटीसमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे रुग्णालय प्रशासनाविरुद्ध कारवाई करण्याबाबत पोलीस विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवले असून रुग्णालय प्रशासनाला 'तो' वादग्रस्त नोटीस काढून टाकण्याचे आदेश दिल्याची माहितीसुद्धा पोलीस निरीक्षक आंभोरे यांनी देशमुख यांना दिली.
२४ तासांत डाॅ. सोनारकर यांना अधीक्षकपदाच्या खुर्चीवरील ताबा सोडण्याचे आदेश देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली असून अधीक्षकांच्या खुर्चीवरच ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देणारी नोटीस जनविकासचे पप्पू देशमुख यांनी रुग्णालयातील मेट ऑफिसजवळ लावली आहे. याबाबत अधिष्ठाता डॉ. हुमने काय कारवाई करतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.