शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

धान संशोधन क्षेत्रात आता एका महिलेने टाकले पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2022 9:55 PM

बारीक पोतीचे धान्य बाजारपेठेत उपलब्ध करण्यात  विदर्भाच्या या मातीतील नागभीड तालुक्याचे फार मोठे योगदान आहे. कारण नांदेड येथील ‘’एचएमटी सोना’’ या धान वाणाचे प्रख्यात संशोधक दादाजी खोब्रागडे आणि ऊश्राळमेंढा येथील ‘’जय श्रीराम’’ धान वाणाचे जनक श्रीराम लांजेवार हे दोन संशोधक या तालुक्याने दिले आहेत आणि आता आसावरी पोशट्टीवार यांच्या रूपाने उच्च शिक्षित अशा महिला धान संशोधक म्हणून त्या पुढे आल्या आहेत. 

राजेश बारसागडेलोकमत न्यूज नेटवर्कसावरगाव : क्षेत्र कुठलेही असो, एखाद्या क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करायची असेल तर  मनुष्याला मुळातच प्रथम आवड निर्माण होणे किंवा असणे गरजेचे असते. तरच त्यात उंचीचे यश गाठता येते. अशाच एका क्षेत्रात जिथे केवळ पुरुषांचे योगदान राहिले आहे. त्या धान संशोधन क्षेत्रात आता एका महिलेच्या रूपाने अगदी शास्त्रोक्त पद्धतीची संशोधिका लाभली आहे. आसावरी नीलेश पोशट्टीवार असे त्यांचे नाव आहे. नागभीड तालुक्यातील तळोधी (बा.) येथील प्रसिद्ध धान उत्पादक शेतकरी अण्णासाहेब पोशट्टीवार यांच्या त्या स्नुषा आहेत.खरं तर धान संशोधन क्षेत्रात अलीकडे फार मोठी क्रांती घडून आली आहे. बारीक पोतीचे धान्य बाजारपेठेत उपलब्ध करण्यात  विदर्भाच्या या मातीतील नागभीड तालुक्याचे फार मोठे योगदान आहे. कारण नांदेड येथील ‘’एचएमटी सोना’’ या धान वाणाचे प्रख्यात संशोधक दादाजी खोब्रागडे आणि ऊश्राळमेंढा येथील ‘’जय श्रीराम’’ धान वाणाचे जनक श्रीराम लांजेवार हे दोन संशोधक या तालुक्याने दिले आहेत आणि आता आसावरी पोशट्टीवार यांच्या रूपाने उच्च शिक्षित अशा महिला धान संशोधक म्हणून त्या पुढे आल्या आहेत. शेतीलाच प्रयोग शाळा मानणाऱ्या अण्णासाहेबांपासून प्रेरणा घेऊन त्यांच्या स्नुषा आसावरी यांनी पूर्वीचा कुठलाही अनुभव नसताना धान संशोधन कार्यात पाऊल ठेवले आणि स्वतःला संशोधन कार्यात झोकून देत अत्यंत बारीक निरीक्षणातून शास्त्रोक्त पद्धतीने त्यांनी अनेक बारीक, अत्यंत बारीक पोतीच्या, सुवासिक, लाल, काळ्या आदी धान वाणाची निर्मिती केली आहे आणि त्यांच्या या कार्याची पावती म्हणून एमएसएमई - डीआय आणि वल्ड वाईड फार्मकडून ‘’वल्ड इनव्हॉटर’’ हा अवॉर्ड त्यांना मिळाला आहे. या कार्यासाठी मुंबईच्या भाभा अणुसंशोधन केंद्राचे माजी वैज्ञानिक डॉ. शरद ई. पवार यांचे वेळीवेळी त्यांना गुरुतुल्य असे  मार्गदर्शन लाभले. तसेच सासरे आणि पती यांचे सुद्धा मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे त्या सांगतात. 

२० वर्षांपासून कार्य सुरूतब्बल २० वर्षांपासून त्यांचे कुटुंबीय धान वाण संशोधन कार्यात खपत आहेत. मात्र, मागील पाच वर्षांपासून त्यांनी त्यांच्याच सहा एकर शेतातील प्रयोगशाळेत नवनवीन धान वाणाच्या जाती - प्रजाती निर्माण करण्यासाठी भरपूर कष्ट उपसले आणि शेतकऱ्यांना सकस, शुद्ध  बियाणे कसे देता येईल. यासाठी प्रयत्न केले. त्या धान वाणाच्या रिसर्चसाठी एका बियाणाचे एक झाड घेतात आणि त्यापासून निर्माण होणाऱ्या शुद्ध व्हेरायटीला सात वर्ष लागतात, असे त्यांचे म्हणणे आहे. 

या वाणांची निर्मितीसद्यस्थितीत शेतकरी व शास्त्रज्ञ यांच्या संयुक्त प्रयत्नाने आसावरी यांनी तळोधी रेड - २५, निशिगंध, तळोधी हिरा - १२५, साईभोग, गणेश, चाफा, गुलाब, चिन्नोर - २७, पार्वती चिन्नोर, तळोधी हिरा - १३५, पार्वती सुत - २७, बासमती ३३-२, नीलम आदी धान वाणांची निर्मिती केली आहे. यातून तयार होणारा तांदूळ आज कर्नाटक, आंध्रप्रदेश, मराठवाडा, तेलंगणा या राज्यात प्रसिद्ध झाला आहे आणि मोठ्या प्रमाणात मागणी आहे. 

प्रत्येक शेतकऱ्याने स्वतःचे बियाणे स्वतः निर्माण करायला हवे व स्वतःच शास्त्रज्ञ बनायला हवे. महिलांनीसुद्धा कुठलीही लाज न बाळगता शेतीच्या संशोधन कार्यात पावले उचलावीत व या क्षेत्रात भरीव योगदान द्यावे.-आसावरी पोशट्टीवार, संशोधक.

 

टॅग्स :agricultureशेती