लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : दानात रक्तदान सर्वश्रेष्ठ दान. आपण केलेल्या रक्तदानामुळे एखाद्या व्यक्तीचा जीव वाचतो. त्याचे आंतरिक समाधान जगातील मोठ्यात मोठ्या ऐश्वर्यापेक्षा जास्त मोलाचे असते. मात्र अनेकदा याच रक्तदानातून एचआयव्ही बाधाही होते. हा धोका कमी करण्यासाठी व एचआयव्हीला प्रतिबंध घालण्यासाठी राज्य रक्तसंक्रमण परिषदेच्यावतीने रक्तदान करताना रक्तदात्याकडून आधार कार्ड घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु या संदर्भात तुर्तासतरी सक्तीचे आदेश निघालेले नाही.राज्यात २५० रक्तपेढ्या आहेत. रक्तदानाच्या जनजागृतीमुळे रक्तदानाचा टक्काही वाढत चालला आहे. मात्र बहुसंख्य पेढ्यांकडून रक्तदानापूर्वी रक्तदात्याचे समुपदेशन होत नाही. यामुळे रक्तदात्यांचे असुरक्षित लैंगिक संबंध होते का, संसर्गित इजेंक्शन वा सलाईनचा वापर झाला होता का, शरीरावर टॅटू गोंदला आहे का, यासारखे महत्वाचे प्रश्न विचारले जात नाही. अनेकदा या प्रश्नांना फाटा देऊ न तुम्हाला रक्तदाब आहे का, मधूमेह आहे का, श्वान चावले होते का, कुठले औषध सुरू आहेत, आदी प्रश्न विचारल्या जातात. शिवाय रक्तदात्यांकडून रक्तदानाची भरून घेतलेल्या अर्जावर अनेक रक्तदाते अर्धवट पत्ता लिहतात. काही रक्तपेढ्या दर तीन महिन्यांनी रक्तदात्यांकडून रक्तदान होण्यासाठी त्याच्या मोबाईलवर वारंवार मॅसेज करतात तर काही फोन करतात.परिणामी अनेक रक्तदाते अर्जावर चुकीचा मोबाईल नंबर देतात. त्यामुळे रक्तदान केल्यानंतर रक्तामध्ये संसर्ग आढळला तर त्यांच्याशी संपर्क करणे रक्तपेढ्यांना शक्य होत नाही. संसर्ग झाल्याची थेट माहिती देण्याऐवजी त्यांना भेटून त्यांचे समुपदेशन करणेही महत्वाचे असते. परंतु अर्धवट पत्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहचताच येत नाही. परिणामी रक्तपेढ्यांकडून अशा बाधितांची माहिती इंटिग्रेड काऊन्सलिंग अॅड टेस्टिंग सेंटरकडे पाठविली जात नाही. यावर उपाय म्हणून राज्य रक्तसंक्रमण परिषदेने रक्तदात्यांकडून आधार कार्ड घेण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी रक्तदाते रक्तदान करताना केवळ नाव लिहून देत होते. त्यामुळे संपर्क करणे कठीण जात होते.गेल्या आठवड्यात रक्तपेढ्या संचालकांना या संदर्भातील सुचना आल्या आहेत. परंतु हे प्रस्तावित असल्याचेही नमूद केले आहे. याकडे तूर्तास तरी रक्तदात्यांना आधारकार्डची सक्ती नाही.संपर्कासाठी आधारकाही रक्तपेढ्या रक्तदान शिबिर घेताना रक्तदात्याचा पत्ता, मोबाईल नंबर या शिवाय इतरही माहिती गांभीर्याने नमूद करून घेत नाही. अनेकदा रक्तदात्यांचे पत्ते, संपर्क क्रमांक चुकीचे असतात. आधार कार्डमुळे रक्तदात्याची संपूर्ण माहिमी मिळते. दरम्यान तपासणीत एचआयव्ही आढळल्याच आयसीटीसी सेंटर व संबंधित दात्याशी संपर्क साधून त्याला उपचाराच्या प्रक्रियेत आणता येते.
आता रक्तदान करण्यासाठी आधार कार्ड होणार अनिवार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 12:31 AM
अनेकदा याच रक्तदानातून एचआयव्ही बाधाही होते. हा धोका कमी करण्यासाठी व एचआयव्हीला प्रतिबंध घालण्यासाठी राज्य रक्तसंक्रमण परिषदेच्यावतीने रक्तदान करताना रक्तदात्याकडून आधार कार्ड घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु या संदर्भात तुर्तासतरी सक्तीचे आदेश निघालेले नाही.
ठळक मुद्देसक्ती नाही : राज्य रक्तसंक्रमण परिषदेचा निर्णय