शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
3
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
4
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
5
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
6
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
7
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
8
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
9
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
10
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
11
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
12
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
13
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
14
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
15
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
16
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
17
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
18
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
19
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
20
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 

ग्रामविकासाच्या आराखड्यासाठी आता ग्रामसभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 5:00 AM

ग्रामसभेच्या माध्यमातून या विकास आराखडयास मंजुरी देण्यात येणार आहे. नुकतीच ७ व ८ नोव्हेंबर रोजी तालुक्यातील सरपंच आणि ग्रामसेवकांची कार्यशाळा घेण्यात आली. यासोबतच तालुकास्तरावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देलगबग सुरू : बाल व महिला सभा घेण्याचे दिले आहेत निर्देश

घनश्याम नवघडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : २०२०-२१ ते २०२४-२५ या वर्षातील 'आमचा गाव आमचा विकास' या आराखड्यासाठी नागभीड पंचायत समितीच्या वतीने कार्यशाळा घेण्यात येत आहेत. त्यानंतर ग्रामसभेच्या माध्यमातून या विकास आराखडयास मंजुरी देण्यात येणार आहे.नुकतीच ७ व ८ नोव्हेंबर रोजी तालुक्यातील सरपंच आणि ग्रामसेवकांची कार्यशाळा घेण्यात आली. यासोबतच तालुकास्तरावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.या आराखडयाच्या अनुषंगानेच १३ व १४ नोव्हेंबर रोजी गणस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत. १३ नोव्हेंबरला ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसंसाधन गट यांची तर १४ नोव्हेंबर रोजी महिला स्वयंसहाय्यता गटाचे ग्रामसंघ, ग्रामसेविका व ग्रामस्तरीय कर्मचारी यांची कार्यशाळा घेण्यात येणार आहे. या गणस्तरीय कार्यशाळा मोहाळी, मौशी, पारडी ठवरे, बाळापूर (बुज), गोविंदपूर, तळोधी (बाळा), गिरगाव व सावरगाव येथे पार पडणार आहेत. या ठिकाणी पार पडणाºया कार्यशाळांना १०० प्रशिक्षणार्थी उपस्थित राहतील, असे अपेक्षित आहे.या कार्यशाळा पार पडल्यानंतर १९ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर या कालावधीत विशेष ग्रामसभा घेण्याचे नियोजन पंचायत समितीने केले आहे. या ग्रामसभेवर देखरेख ठेवण्यासाठी प्रभारी आधिकारी यांची नियुक्तीसुद्धा करण्यात आली आहे. ग्रामसभेपूर्वी बालसभा, मागास व उपेक्षित घटकांची सभा, वार्ड सभा, महिला सभा आदी प्रकारच्या सभा घ्याव्यात, अशा सूचना पंचायत समितीच्या वतीने सर्व सरपंच व ग्रामसेवकांना देण्यात आल्या आहेत.हे अभिप्रेतकृषी, आरोग्य, महिला व बालकल्याण, समाजकल्याण, सिंचाई, पंचायत विभाग, बांधकाम विभाग या व अन्य प्रत्येक विभागाची कामे या ग्रामसभेत नागरिकांकडून सूचविण्याचे अभिप्रेत आहे. या सूचविण्यात आलेल्या कामानुसारच पुढील आराखडा निश्चित होणार आहे.या ग्रामसभेत गाव विकासाच्या दृष्टीने जी कामे सूचविण्यात येतील. त्यानुसार पुढच्या पाच वर्षात कामे होणार आहेत. म्हणूनच या ग्रामसभांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. आमचा गाव आमचा विकास या योजनेच्या यशस्वीतेसाठी नागरिकांनी ग्रामसभेस उपस्थित राहणे गरजेचे आहे.- प्रणाली खोचरेगटविकास आधिकारी पं.स.नागभीड

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकास