शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

आता जीवनाश्यक वस्तूंसह अन्य दुकानेही उघडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 5:00 AM

अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचारी वगळता इतर व्यक्तींना संध्याकाळी ७ नंतर आणि सकाळी ७ पूर्वी बाहेर फिरण्यास मनाई असेल. यावेळी फक्त मालवाहतूक सुरू राहील. अत्यावश्यक सेवांची दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहतील. याशिवाय इतर सर्व प्रकारची दुकाने उघडे करण्याची परवानगी असणार आहे. ही दुकाने सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंतच सुरू राहतील.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश । जिल्ह्यांतर्गत करता येणार विनापास प्रवास, मोठा दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अनेक भागात अडकलेले नागरिक चंद्रपूर जिल्ह्यात पोहोचत आहेत. त्यामुळे आपण कोरोनाच्या सावटाखाली कायम आहोत. मात्र तरीही सोमवारपासून काही बाबींमध्ये शिथिलता देण्यात येत आहे. जिल्ह्यात १४४ कलम लागू असून नागरिकांनी गरज नसताना घराबाहेर पडू नये. सोमवारपासून जीवनावश्यक वस्तूवगळता अन्य दुकानांनाही उघडण्याचे परवानगी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली आहे. मात्र ही दुकाने सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंतच उघडावी लागणार आहे.अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचारी वगळता इतर व्यक्तींना संध्याकाळी ७ नंतर आणि सकाळी ७ पूर्वी बाहेर फिरण्यास मनाई असेल. यावेळी फक्त मालवाहतूक सुरू राहील. अत्यावश्यक सेवांची दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहतील. याशिवाय इतर सर्व प्रकारची दुकाने उघडे करण्याची परवानगी असणार आहे. ही दुकाने सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंतच सुरू राहतील. सर्व हॉटेल, लॉज यांना तेथे वास्तव्यास असणाऱ्या ग्राहकांना आरोग्यविषयक आवश्यक ती खबरदारी घेऊन रेस्टॉरंटमध्ये खाद्यपदार्थ बनवून फक्त पार्सल सुविधा देण्यास परवानगी राहील.मात्र अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने ही सोमवार ते शनिवार या दिवसांसाठी फक्त उघडे राहतील रविवारी ही दुकाने बंद राहतील. जिल्हाअंतर्गत प्रवासासाठी कोणत्याही पासची यापुढे आवश्यकता राहणार नाही. आंतरजिल्हा वाहतुकीसाठी प्रशासनाची परवानगी व पास घेणे बंधनकारक राहील.ऑटोरिक्षा सुरूमहानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती या क्षेत्रापुरते केवळ रिक्षाचालकांना परवानगी असणार आहे. यामध्ये रिक्षाचालक व केवळ दोन प्रवासी एवढीच प्रवाश्यांची मुदत राहणार आहे. या प्रवासी क्षमतेच उल्लंघन आढळून आल्यास संबंधित व्यक्तींवर गुन्हा नोंदविण्यात येईल. दुचाकी वाहनावर केवळ एक व्यक्तीला परवानगी राहील तसेच चारचाकी वाहनांमध्ये चालकाव्यतिरिक्त इतर दोन व्यक्ती म्हणजेच तीन व्यक्तींनाच परवानगी असणार आहे.हे बंदच राहणारउपहारगृहे, खाद्यगृहे, खानावळ, शॉपिंंग कॉम्प्लेक्स, मॉल्स, सुपर मार्केट, मनोरंजनाची ठिकाणे, क्लब, पब, क्रीडांगणे, मैदाने, जलतरण तलाव, उद्याने, सिनेमागृहे, नाटयगृहे, शाळा, महाविद्यालये, खासगी शिकवणी वर्ग, व्यायामशाळा, संग्रहालये, गुटखा-तंबाखु विक्री इत्यादी बंदच राहील. जिल्ह्याच्या सीमा आजही बंद आहेत. आंतरराज्य व जिल्हा यांची मनुष्य वाहतूक याला पूर्णता बंदी आहे.सार्वजनिक कार्यक्रम रद्दचजिल्ह्यामध्ये घेण्यात येणारे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक, क्रीडा विषयक प्रदर्शने व शिबिरे, सभा, मेळावे, जत्रा, यात्रा, रॅली, धरणे आंदोलन, इत्यादी कार्यक्रमास मनाई करण्यात येत आहे. तसेच जनतेसही एकत्र जमण्यास मज्जाव करण्यात येत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजार