-----
हॉटेल व्यवसाय पुन्हा कधी उभा राहणार
निर्बंध शिथिल केल्यानंतर आता व्यवसायाला थोडी उभारी मिळत होती. परंतु, आता पुन्हा निर्बंध लादले. त्यामुळे अडचण जाणार आहे. हॉटेल व्यवसायावर केवळ हॉटेल व्यावसायिकच नाही तर तेथे काम करणाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचे उदरनिर्वाह चालत असतो. आर्थिक संकट असतानाही वीज बिल भरण्यासाठी एमएसइबीकडून तगादा लावण्यात येत आहे. आता पुन्हा व्यवसाय सुरू ठेवण्याची वेळ कमी केल्याने तसेच वीकेंडला बंद ठेवण्याचे निर्देश असल्याने पुन्हा समस्या निर्माण होणार आहे.
मयूर व्यास, हॉटेल व्यावसायिक
--------
मागील दीड वर्षापासून कोरोनामुळे हॉटेल बंद चालू राहत असल्याने मोठा फटका बसला आहे. २१ जूनपासून निर्बंध शिथिल केले होते. त्यामुळे थोडा दिलासा मिळाला होता. परंतु, आता पुन्हा नव्या निर्बंधामुळे अडचणी निर्माण होणार आहेत. ५० टक्के क्षमतेवर हॉटेल व्यवसाय आठवडाभर सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी.
- भूषण पगडपल्लीवार, हॉटेल व्यावसायिक
-----
हॉटेल कर्मचाऱ्यांचे तर आणखी हाल
निर्धारीत वेळेवर केवळ आठवड्याचे पाचच दिवस हाॅटेल सुरू राहिल्यास. व चार वाजताच हॉटेल बंद झाल्यास मालक पूर्ण कर्मचाऱ्यांना बोलविणार नाही. त्यामुळे आमची रोजी-रोटी जाईल. पूर्वीच कोरोनाने आर्थिक संकट आहे. आता पुन्हा बिकट परिस्थिती निर्माण होईल.
- राजू मडावी, हॉटेल कर्मचारी
------
पाच दिवस हॉटेल सुरू राहिल्यास पूर्ण पगार मिळणार नाही. मागील वर्षीच्या लॉकडाऊनमुळे आर्थिक घडी विस्कटलेली आहे. आता पुन्हा या निर्बंधामुळे आर्थिक संकट निर्माण होणार आहे.
प्रशांत गेडाम, हॉटेल कर्मचारी
-------
साधरणात: रेस्टारंट हॉटेलमध्ये सायंकाळच्या सुमारास ग्राहक येत असतात. मात्र चार वाजता हॉटेल बंद झाल्यास ग्राहक येणार नाही. मागील लॉकडाऊनमुळे मोठे नुकसान झाले आहे. आता या निर्बंधामुळे पुन्हा तशीच वेळ आली आहे.
शनिवार व रविवारला हॉटेलमधील ग्राहकांची संख्या अधिक असायची. मात्र वीकेंडला रेस्टारंट बंद राहिल्यास मोठा फटका बसणार आहे.