लोकमत न्यूज नेटवर्कब्रम्हपुरी : शुक्रवारी पार पडलेल्या नगरपालिकेच्या सभेत उपाध्यक्षपदी रिपाइंचे अशोक रामटेके यांची अविरोध निवड झाली. तर स्वीकृत नगरसेवकपदी विदर्भ माझा पार्टीकडून राकेश कऱ्हाडे, तर काँग्रेसचे बाळू राऊत यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी आ. विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष रिता उराडे यांनीही आपला पदभार स्वीकारला.ब्रम्हपुरी पालिकेची सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर शुक्रवारी पहिलीच सभा पार पडली. या सभेत उपाध्यक्ष व दोन स्वीकृत नगरसेवक यांची निवड करण्याविषयी जिल्हाधिकारी यांच्या पत्रानुसार निवडणूक घेण्यात आली. निवडणुकीत काँग्रेस-रिपाईने ११, विदर्भ माझा पार्टीने सहा तर भाजपाने तीन जागांवर विजय संपादन केला होता. काँग्रेस-रिपाइंने नगराध्यक्षसहीत ११ जागा जिंकून बहुमत प्राप्त केल्याने रिपाइंचे अशोक रामटेक यांची उपाध्यक्षपदी अविरोध निवड करण्यात आली. तर काँग्रेस पक्षाचे बाळू राऊत यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून निवडण्यात आले आहे. विदर्भ माझा पार्टीने राकेश कऱ्हाडे यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड केली आहे. यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांनी कामकाज पाहिले.
न.प. उपाध्यक्षपदी अशोक रामटेके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2019 11:02 PM
लोकमत न्यूज नेटवर्क ब्रम्हपुरी : शुक्रवारी पार पडलेल्या नगरपालिकेच्या सभेत उपाध्यक्षपदी रिपाइंचे अशोक रामटेके यांची अविरोध निवड झाली. तर ...
ठळक मुद्देराकेश कऱ्हाडे, बाळू राऊत स्वीकृत नगरसेवकपदी