कोरोना विषाणूची लागण होऊन राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतमधील अनेक कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या परिवारास शासनाने भरीव मदत करावी, यासोबतच कर्मचाऱ्यांचे वेतन अनियमितपणे मिळत असल्याने कर्मचाऱ्यांना आर्थिक ताळमेळ जुळवताना मोठी कसरत करावी लागते. सोबतच निवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन अनियमित दिले जाते. यामुळे निवृत्त कर्मचारी मेटाकुटीस आले आहे. या मागण्यांची पूर्तता व्हावी, यासाठी राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी आंदोलने करून शासनाला निवेदन दिले. तरी त्याचा फायदा झाला नाही. त्यामुळे राज्यातील नगर परिषद व नगरपंचायतमधील कर्मचारी १ मे कामगार दिनाच्या ध्वजारोहणानंतर अत्यावश्यक सेवेसह काम बंद आंदोलन करणार आहे. तसेच कोरोनाने मृत्यू झालेल्या मृतदेहावर अंत्यसंस्कार कर्मचारी करणार नाही, अशी माहिती निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्य नगरपरिषद नगरपंचायत कर्मचारी संवर्ग संघटनेचे अध्यक्ष शरद तोटावार उपाध्यक्ष सूरज पुनवटकर, सचिव उमेश कथडे, सचिव जयंत कांबळे, कोषाध्यक्ष सुरेश वदनलवार, सहकोषाध्यक्ष सुनील बोस, संघटनमंत्री भारत नवे यांनी दिली.
न.प. कर्मचाऱ्यांचे आजपासून काम बंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2021 4:26 AM