नागभीड नगर परिषदेत ४० सफाई कामगार आहेत. कोरोना काळात न.प.च्या या सफाई कामगारांनी उत्तम कामगिरी केली. या कामगिरीची बक्षिसी म्हणून प्रत्येक कामगाराला तीन हजार रुपये देण्याचे ठरविले होते. मे महिन्यात झालेल्या सभेत तसा ठरावही संमत करण्यात आला होता.
या बाबीस आता चार महिन्याचा कालावधी होत असला तरी नगर परिषद ही रक्कम देण्याचे नाव घेत नसल्याने या कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला. त्यांना आपली व्यथा नगरसेवक प्रतीक भसीन आणि संजय अमृतकर यांना सांगितली. लागलीच भसीन आणि अमृतकर यांच्या नेतृत्वाखाली या सर्व कामगारांनी नगर परिषदेवर धडक दिली आणि नगराध्यक्ष प्रा.डॉ.उमाजी हिरे यांच्या कक्षात जाऊन प्रोत्साहन रकमेची विचारणा केली. यावेळी चर्चा करताना प्रशासकीय बाबी पडताळून हा भत्ता अदा करण्यात येईल असे उत्तर नगराध्यक्ष हिरे यांनी दिले. मात्र या उत्तराने कामगारांचे समाधान झाले नाही. प्रशासकीय बाबी पडताळायच्याच होत्या तर ठराव करण्यापूर्वी पडताळायच्या होत्या व नंतर ठराव करायचा होता, अशा प्रतिक्रिया यासंदर्भात व्यक्त होत आहेत.
250921\1428-img-20210925-wa0013.jpg
प्रोत्साहन भत्त्यासाठी न.प.समोर जमलेले सफाई कामगार