चंद्रपूर : जिल्ह्यात सध्यास्थितीत ॲक्टिव्ह रुग्णसंख्या ५०वर पोहोचली आहे. रविवारी जिल्ह्यात चार जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच सात जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात रविवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही.
बाधित आलेल्या सात रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील तीन, चंद्रपूर तालुका एक, बल्लारपूर दोन, राजुरा एक रुग्ण आढळले आहे. भद्रावती, ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही, मुल, सावली, पोंभुर्णा, गोंडपिपरी, चिमूर, वरोरा, कोरपना, जिवती या तालुक्यात एकही रुग्ण आढळले नसून ही दिलासा देणारी बाब आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ८८ हजार ६६६वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ८७ हजार ७६ झाली आहे. सध्या ५० बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ६ लाख ७९ हजार ६९७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ५ लाख ८९ हजार ५३३ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ५४०
बाधितांचे मृत्यू झाले आहे.