१ मार्चपासून लक्षणे नसणाऱ्या रुग्णांची संख्या चढतीवरच असल्याने यापुढे नागरिकांना मोठी खबरदारी पाळावी लागणार आहे.
कोविड-१९ व्हायरस व्यक्तीपरत्वे वेगवेगळ्या प्रकारे प्रभावित करतो. बऱ्याच संक्रमित व्यक्तींमध्ये सौम्य ते मध्यम लक्षणे दिसून येतात. अशा व्यक्तींनाही डॉक्टरांकडे जाऊन तपासणी केली पाहिजे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जात आहे. सामान्य लक्षणांमध्ये ताप, कोरडा खोकला, थकवा, कमी सामान्य लक्षणात ठणका व वेदना होणे, घसा खवखवणे, जुलाब होणे, डोळे लाल होणे, डोकेदुखी, चव किंवा गंध न कळणे आदी लक्षणे दिसून शकतात. गंभीर लक्षणांमध्ये श्वास घेण्यात त्रास होणे किंवा श्वास लागणे, छातीत दुखणे, दबाव येणे, बोलता न येणे किंवा हालचाल करता न येणे आदी गंभीर लक्षणे मानली जातात. अशा व्यक्तींनी तातडीने आरटीपीसीआर अथवा अॅन्टिजेन चाचणी करण्याचा सल्ला जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून दिला जात आहे.
‘अर्ली डिटेन्शन’ टाळणार पुढचा धोका!
एखाद्याला कोरोनाची लागण झाल्यास त्यामध्ये लक्षणे दिसून येण्यासाठी सुमारे पाच ते सहा किंवा १४ दिवसदेखील लागू शकतात, अशा मार्गदर्शक सूचना आहेत. त्यामुळे जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून दररोज अडीच हजारपेक्षा जास्त आरटीपीसीआर आणि दोन हजारहून अधिक अॅन्टिजेन अशा एकूण चार हजार ५०० चाचण्या केल्या जात आहेत. त्यामुळे पुढचा धोका टाळण्यासाठी ाुग्णाचा लवकर शोध (अर्ली डिटेन्शन) घेऊन उपचार करणे म्हणजे पुढील संसर्गालाही तात्काळ प्रतिबंध घालणे होय. सध्या तरी जिल्हा आरोग्य यंत्रणा हेच सूत्र वापरत असल्याचे दिसून येत आहे.
चार हजार चाचण्यांचा अहवाल ‘वेटिंग’वर
जिल्ह्यात २६ मार्चपर्यंत झालेल्या चार हजार आरटीपीसीआर चाचण्यांचा अहवाल जाहीर झाला नाही. शिवाय, ७५९ अहवाल प्रतीक्षेत आहेत. फेब्रुवारी २०२१ च्या अखेरीस कोरोनाचा दैनिक पॉझिटिव्ह रेट ०१ होता. सध्याचा प्रगतीपर रेट १२.६ वर पोहोचला. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेतली नाही तर मोठे संकट उद्धभण्याचा धोका आहे.
आता १९ ते ४० वयोगटात रुग्णवाढ
जिल्ह्यातील २६ हजार ७०१ कोरोना रूग्णांमध्ये १९ ते ४० वयोगटात आता झपाट्याने रुग्णवाढ होत आहे. आतापर्यंत ११ हजार ४८५ बाधित झाले. ० ते ५ वयोगटात ४१४, ६ ते २८ वयोगटात २ हजार २०२, ४१ ते ६० वयोगटात ९ हजार ३२९ तर ६१ वर्षांवरील ३ हजार २७१ जण बाधित झाले आहेत.
लक्षणनिहाय कोविड रुग्ण (२६ मार्चपर्यंत)
लक्षणे नसलेले २७८
मध्यम - ९४
सौम्य -२१७
गंभीर -२५
ऑक्सिजनवर -९२
व्हेंटिलेटरवर -०६
आयसीयूमध्ये -४७