एकूण रुग्णसंख्या ३०३१ वर गेली आहे. कोरोनाने ग्रामीण भागात शिरकाव केल्याने भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे. शासनाने दिलेल्या नियमांचे पालन केल्यास कोरोनावर पायबंध घातला जाऊ शकतो. या दृष्टीने प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी विशेष लक्ष घालत असल्याचे दिसून येत आहे.
कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता या क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार व पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकारातून ऑक्सिजन बेड व इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मूलच्या उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजनच्या पाइपलाइनचे काम सुरू आहे. येत्या आठ दिवसात जनतेला मूल येथे ५० ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. यामुळे मूल तालुक्यातील जनतेला इतरत्र भटकंती करावी लागणार नाही. सध्या ३१५ बेडची व्यवस्था असून, उपजिल्हा रुग्णालयात ७५, नगरपालिका मॉडेल स्कूल १५० तर एस. एम. लॉन ९० बेड उपलब्ध करण्यात आले आहे. ॲक्टिव्ह रुग्ण ५२५ असून, या तिन्ही केंद्रात २०२ रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह अलगीकरणात ३१२ रुग्ण आहेत. यात १२१ पुरुष व ८१ महिला रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागातही कोरोनाने शिरकाव केला आहे. चिखली गावात ५ जणांचा मृत्यू झाला आहे.