जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ८२ हजार ३०७ वर पोहोचली आहे. तसेच सुरूवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ७७ हजार ६३३ झाली आहे. सध्या ३ हजार २३५ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ४ लाख ६८ हजार ७०१ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ३ लाख ८३ हजार ३८३ नमुने निगेटिव्ह आले आहेत.
बाॅक्स
मृतांमध्ये ३८ वर्षीय महिलेचा समावेश
शनिवारी मृत झालेल्यांमध्ये चंद्रपूर शहरातील खुटाळा येथील ५४ वर्षीय महिला, समता नगर येथील ७५ वर्षीय पुरुष, परसोडी येथील ७२ वर्षीय पुरुष. बल्लारपूर तालुक्यातील ३८ वर्षीय महिला. वरोरा तालुक्यातील ७० वर्षीय पुरुष. सिंदेवाही तालुक्यातील ७० वर्षीय पुरुष. गोंडपिपरी तालुक्यातील ७३ वर्षीय पुरुष. चिमूर तालुक्यातील ताडगाव येथील ५८ वर्षीय पुरुष. चामोर्शी तालुक्यातील ६३ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
बाॅक्स
मृत्यूचा आकडा १४३९ वर
जिल्ह्यात आतापर्यंत १४३९ बाधितांचे मृत्यू झाले आहे. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील १३३४, तेलंगणा दोन, बुलडाणा एक, गडचिरोली ३८, यवतमाळ ४८, भंडारा ११, वर्धा एक, गोंदिया दोन आणि नागपूर येथील दोन बाधितांचा समावेश आहे.
बाॅक्स
चंद्रपूर मनपात सर्वाधिक नवे बाधित
नव्याने बाधित आलेल्या ११० रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील २२, चंद्रपूर तालुका ७, बल्लारपूर १५, भद्रावती २, ब्रह्मपुरी १८, नागभिड १, सिंदेवाही ३, मूल ७, सावली १, पोंभूर्णा ००, गोंडपिपरी २, राजूरा ११, चिमूर ४, वरोरा ४, कोरपना १२, जिवती ०० व इतर ठिकाणच्या १ रुग्णांचा समावेश आहे.
बाॅक्स
कोराेना संपल्याचा समज करू नये-जिल्हाधिकारी
नागरिकांनी कोरोना पूर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे या त्रिसूत्रीचा नियमित वापर करावा. स्वत:ची काळजी घ्यावी तसेच ४५ वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.