राजेश मडावी।आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : जिल्ह्यातील माती तपासणी अहवाल जाहीर झाला असून, शेतीला पूरक असणाºया सूक्ष्म मूलद्रव्यांचीच कमतरता आढळली. अनिष्ट घटकांची उणीव दूर करण्यास शेतकऱ्यांमध्ये जागृती घडविणे आणि दरवर्षी मातीची (मृद) तपासणी करण्यास प्रोत्साहन देणे कृषी विभागासाठी मोठे आव्हान ठरणार आहे.पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी दरवर्षी माती परीक्षण करण्याची मोहीम केंद्र व राज्य शासनाने सुरू केली. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत दहा हजारांहून अधिक मातीचे नमुने तपासण्यात आले. जिरायती क्षेत्राच्या दहा हेक्टर क्षेत्रातून एक मृद नमुना तपासणीकरिता घेण्यात आला होता. या तपासणी अहवालानुसार जमिनीत सूक्ष्म मूलद्रव्यांची कमरता असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवाय, लोह व जस्त या दोन सूक्ष्म मूलद्रव्यांची कमरता आढळली. मातीतील ही कमतरता पिकांच्या उत्पादनवाढीसाठी मारक असल्याचे कृषितज्ज्ञांचे म्हणणे आहे. सद्य:स्थितीत माती नमुन्यांची तपासणी सुरू असून, दीड हजार आरोग्य पत्रिकेचे वाटप झाले आहे.मातीतील महत्त्वाचे घटकशेतीपूरक मातीत चार घटक महत्त्वाचे असतात. त्यामध्ये ४५ टक्के रासायनिक पदार्थ, ५ टक्के सेंद्रीय पदार्थ, २५ टक्के पाणी तसेच २५ टक्के असल्याशिवाय शेतमालाचे उत्पादन होऊ शकत नाही. हे घटक संतुलित राहिल्यास पिकांची उत्पादकता वाढते. माती तपासणी न करता रासायनिक खतांचा वारेमाप केल्याने शेतीपूरक सूक्ष्म जीवांचे प्रमाण नष्ट होते. गांडुळासारखे विविध प्रकारचे कृमी मृत पावतात. त्यामुळे मृदा म्हणजे माती परीक्षण केले पाहिजे. परंतु, तपासणी करणाºया जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रमाण अद्याप वाढले नाही.आरोग्यपत्रिकेतून बोधामृतमृद तपासणी केल्यानंतर कृषी विभागाकडून शेतकºयांना आरोग्यपत्रिकेद्वारे उपाययोजना सूचविली जाते. या उपाययोजनांमध्ये जमिनीची पूर्वमशागत, आंतरमशागत, पिकांचे पेरपालट, शेणखत, गांडूळखत, जिवाणू खतांचा वापर आणि जल व मृदसंधारणीची कामे आदींचा समावेश असतो. अल्प व मध्यम भूधारक शेतकºयांची स्थिती लक्षात घेता हा आर्थिक बोझा पेलविणे शक्य होत नाही. अनेक योजना शेतकºयांपर्यंत पोहोचविले जात नाही. पण, आरोग्यपत्रिकेद्वारे बोधामृत पाजण्याचा प्रकार सुरूच आहे.असे आहेत मातीचे आजारमृद अहवालानूसार शेतीपूरक मातीची अल्कधर्मी कामू कमी झाला. सेंद्रीय कर्बाची कमरता आहे. सतत एकाच पीक पद्धतीचा अवलंब केल्याने पोत बिघडला. अन्न द्रव्यांचा ऱ्हास झाला. क्षारयुक्त चोपण जमिनीच्या व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष आणि जमिनीची धूप, आदी मृद आजारांमुळे कृषी उत्पादनाला फ टका बसत आहे.एक दृष्टिक्षेप...कृषी विभागाने राज्यातून १४ लाख ७४ हजार मातीचे नमुने तपासणीकरिता घेतल होते. त्यापैकी ६० हजार नमुन्यांची तपासणी पूर्ण झाली. ६८ लाख ४९ हजार शेतकऱ्यांना जमिनीची आरोग्यपत्रिका देण्याचे उद्दिष्ट होते. मात्र, आतापर्यंत केवळ आठ लाख ८१ हजार शेतकऱ्यांनाच ही आरोग्यपत्रिका देण्यात आली आहे.
शेतजमिनीत घातक घटकांचीच संख्या अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2017 11:55 PM
राजेश मडावी।आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : जिल्ह्यातील माती तपासणी अहवाल जाहीर झाला असून, शेतीला पूरक असणाºया सूक्ष्म मूलद्रव्यांचीच कमतरता आढळली. अनिष्ट घटकांची उणीव दूर करण्यास शेतकऱ्यांमध्ये जागृती घडविणे आणि दरवर्षी मातीची (मृद) तपासणी करण्यास प्रोत्साहन देणे कृषी विभागासाठी मोठे आव्हान ठरणार आहे.पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी दरवर्षी माती परीक्षण करण्याची मोहीम केंद्र व राज्य ...
ठळक मुद्देमृद तपासणी अहवालातील नोंदी : सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता