चंद्रपूर : कोरोना संकटामुळे मागील दीड वर्षापासून रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी विशेष एक्स्प्रेस चालविल्या जात आहेत. मात्र या गाड्या प्रत्येक रेल्वे स्टेशनवर थांबत नसल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दुसरीकडे स्पेशल ट्रेनच्या नावाखाली प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता सार्वजनिक वाहतूक सुरू झाली आहे. मात्र अद्यापही रेल्वे सेवा सुरळीत सुरू झाली नाही. पॅसेंजर बंद असल्यामुळे जवळपासच्या गावांना रेल्वेने प्रवास करणे सध्यातरी बंद आहे. यामध्ये प्रवाशांना आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, चंद्रपूर तसेच परिसरातील नागरिकांना मुंबई येथे जाण्यासाठी असलेली सेवाग्राम एक्स्प्रेसही बंद आहे. त्यामुळे येथील प्रवाशांना वर्धा येथून विशेष रेल्वे पकडावी लागत आहे. यामध्ये शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्यांना प्रत्येक रेल्वे स्टेशनवर थांबा द्यावा; नाही तर पॅसेंजर सुरू करून दिलासा द्यावा, अशी मागणी आता रेल्वे प्रवासी करीत आहेत.
बॉक्स
या ठिकाणी रेल्वे कधी थांबणार?
कोरोना संकटापूर्वी ज्या ठिकाणी रेल्वे थांबत होत्या आता त्यातील काही मोजक्याच ठिकाणी रेल्वे थांबत आहे. विशेष म्हणजे, सध्या पॅसेंजर बंद असल्यामुळे प्रवास करताना नागरिकांना मोठा त्रास होत आहे. त्यामुळे विशेष रेल्वे गाड्यांचे प्रत्येक रेल्वे स्टेशनवर थांबे द्यावेत, अशी मागणी केली जात आहे.
बाॅक्स
सध्या सुरू असलेल्या रेल्वे
नवजीवन
संघमित्रा
दक्षिण
जीटी
तामिलनाडू
तेलंगणा
बंगलोर - निजामुद्दीन
दानापूर - सिकंदराबाद
केरला
विशाखापट्टणम - नवी दिल्ली
यशवंतपूर - निजामुद्दीन
कोट...
थांबा नसल्याने आम्हाला होतोय त्रास
कोरोना संकटामुळे नियमित रेल्वे सेवा बंद आहे. यातील काही विशेष रेल्वे सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र त्या प्रत्येक रेल्वे स्टेशनवर थांबत नसल्यामुळे प्रवास करणे कठीण झाले आहे. त्यामुळे सेवाग्राम, आनंदवन या रेल्वे सुरू करून दिलासा द्यावा.
- श्रीकांत खडसे, चंद्रपूर
कोट
कोरोना संकटापूर्वी सेवाग्राम एक्स्प्रेस सुरू होती. त्यामुळे चंद्रपूर तसेच इतर ठिकाणाहून मुंबईला जाणे सोपे होते. मात्र आता ही रेल्वे बंद आहे. त्यामुळे प्रवाशांना वर्धा येथील स्टेशनवरून मुंबईला जावे लागते. त्यामुळे ही रेल्वे सुरू करणे अत्यावश्यक आहे.
- अनुप खुटेमाटे, भद्रावती
००
कोट
कोरोना संकटानंतर पॅसेंजर तसेच इतर एक्स्प्रेस बंद आहेत. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वे प्रशासनाकडे या पॅसेंजर सुरू करण्यासंदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला आहे. विशेष ट्रेनच्या नावाखाली प्रवाशांची अक्षरश: लूट सुरू आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या स्पेशल ट्रेन प्रत्येक स्टेशनवर थांबवाव्यात किंवा पॅसेंजर सुरू करून प्रवाशांना दिलासा द्यावा.
- श्रीनिवास सुंचूवार
झेडआरयूसीसी सदस्य, मध्य रेल्वे