लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : तालुक्यातील कोंढाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत कमल शंकर पायघन, शारदा बेलेकर या स्वयंपाकी, मदतनीस महिलांना चुकीच्या पध्दतीने कामावरुन कमी करण्यात आल्याच्या निषेधार्थ शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनतर्फे पंचायत समितीसमोर निदर्शने करण्यात आली. संघटनेचे राज्य महासचिन विनोद झोडगे, राजु गैनवार, सुनीता बेलोकार यांच्या नेतृत्वात गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.जिल्हा परिषद शाळेतील जुनी स्वयंपाकी कमल पायघन, मदतनीस शारदा बेलेकर यांना कोणतीही चूक नसताना कामावरून कमी करण्यात आले. मागील कित्येक वर्षापासून त्या तुटपुंज्या मानधनावर स्वयंपाक बनविण्याचे काम करीत होत्या. फेबु्रवारी महिन्यात त्यांना कुठलीही चूक नसताना शाळा व्यवस्थापन समितीने कोणतेही कारण नसताना त्यांना कामावरून कमी केले. त्यांच्याऐवजी आपल्या मर्जीतील महिलांना कामावर घेतले. त्यामुळे या महिलांचे कुटुंब आता संकटात सापडले आहे. १० जुलै २०१४ च्या सुधारित परिपत्रकानुसार जुन्या स्वयंपाकी मदतनीस कर्मचाºयांवर गंभीर स्वरूपाचे आरोप सिध्द झाल्याशिवाय त्यांना कामावरून कमी करता येत नाही. मात्र, शालेय व्यवस्थापन समितीने शासन परिपत्रकाचा आधार न घेता सरसकट महिलांना कमी केले. याची वरिष्ठ स्तरावरून चौकशी करावी, जुन्या स्वयंपाकी, मदतनीस कर्मचाºयांना कामावर परत घेण्याच्या मागणी निवेदन वरिष्ठ अधिकारी विनोद ढोक यांना देण्यात आले. या मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनाही देण्यात आले होते.मानधनात वाढ करावीशालेय पोषण आहार कर्मचाºयांना मानधन, इंधन बिल दर महिन्यांच्या पाच तारखेला त्यांच्या बँक खात्यात जमा करावे. शालेय पोषण कर्मचाºयांना अन्य कामे सोपवू नये. मानधनात वाढ करावी, त्यांना डेÑसकोड ओळखत्र देण्यात यावे, अशी मागणी यावेळी संघटनेने केली आहे.
पोषण आहार कर्मचाऱ्यांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2019 12:47 AM
तालुक्यातील कोंढाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत कमल शंकर पायघन, शारदा बेलेकर या स्वयंपाकी, मदतनीस महिलांना चुकीच्या पध्दतीने कामावरुन कमी करण्यात आल्याच्या निषेधार्थ शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनतर्फे पंचायत समितीसमोर निदर्शने करण्यात आली.
ठळक मुद्देगटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन : चुकीच्या पद्धतीने कामावरुन काढल्याचा आरोप