लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ओबीसींची जातनिहाय जनगणना करा, राजकीय व इतर क्षेत्रातील व जिल्ह्यातील आरक्षण पुर्ववत करा, अन्यथा सत्ता सोडा, ओबीसींचे आरक्षण अबाधित ठेवा, नवे पर्व ओबीसी सर्व असा एल्गार करीत ओबीसी समाजाने जिल्हाभरातील तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉ. अशोक जिवतोडे यांच्या मार्गदर्शनात निदर्शने केली.चंद्रपूर येथेही जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ निदर्शने करण्यात आले. यावेळी ओबीसी आरक्षण पुर्ववत करा, ओबीसी जनगणना करा, ओबीसी समाजाच्या समस्या सोडवा, अन्यथा सत्ता सोडा, असा इशारा डाॅ. अशोक जिवतोडे यांनी सरकारला दिला.यावेळी आंदोलनात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सचिन राजुरकर, बबनराव फंड, बबनराव वानखेडे, नितिन कुकडे, नंदु नागरकर, संदीप आवारी, राजु कक्कड, डॉ. सुरेश महाकुलकर, प्रा. सुर्यकांत खनके, प्रा. अनिल शिंदे, कुणाल चहारे, अजय बलकी, महिला जिल्हाध्यक्ष जोत्सना राजुरकर, पोर्णीमा मेहरकुरे, प्रा. रविकांत वरारकर, विजय मालेकर, प्रा. रवी जोगी, मंगेश पाचभाई, गणेश आवारी, पारस पिंपळकर, शाम राजुरकर, देवराव दिवसे, भुवन चिने, संदीप पिंपळकर, राजकुमार नागापुरे, नंदकिशोर टोंगे, रंजीत पिंपळशेंडे, रवी टोंगे, सुनिल मुसळे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी, ओबीसी संघटना, सहभागी झाल्या होत्या.
भद्रावतीत ओबीसींचे आंदोलनभद्रावती : ओबीसींची जातनिहाय जनगणना करा, ओबीसींचे राजकीय व इतर क्षेत्रांतील व जिल्ह्यातील आरक्षण पूर्ववत करा, आदी मागण्यांसाठी ओबीसी समाजाने तहसील कार्यालयासमोर डॉ. अशोक जीवतोडे यांच्या मार्गदर्शनात निदर्शने केली. यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे रवींद्र शिंदे, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर डुकरे, प्रशांत काळे, नितेश खरवडे, उमेश काकडे, पुरुषोत्तम मत्ते, सुनील आवारी, आदम सौदागर, अजय विधाते, ज्योती मोरे, आशिष ठेंगणे, कवडू मत्ते, स्वप्निल मोहीतकर, अतुल कोल्हे, राजू डोंगे, उमेश कांबळे, विकास डुकरे, राकेश खुसपुरे, राहुल झाडे, जितू पारखी, संदीप गोखरे, अमोल नागपुरे, देवेंद्र नागपुरे आदी उपस्थित होते.
तहसीलदारांना निवेदननागभीड : ओबीसी समाजाने येथील तहसील कार्यालयासमोर निदर्शने करीत तहसीलदार मनोहर चव्हाण यांना निवेदन दिले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष दिगंबर चौधरी, उपाध्यक्ष शिवशंकर कोरे, श्रीपत मटाले, राजेंद्र आमले, पुरुषोत्तम बगमारे, सीताराम बावणकर, विनाजी निकुरे, गजानन देशकर, रोशन सोनुले आदींसह अनेकांची उपस्थिती होती.
सावलीतही निदर्शनेसावली : ‘ तहसील कार्यालयासमोर निदर्शने केली. आंदोलनात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे तालुका अध्यक्ष कविंद्र रोहणकर, सचिव भाऊराव कोठारे, अविनाश पाल, प्रकाश पा. गड्डमवार, विजय कोरेवार, उषाताई भोयर, सतीश बोमावार, संजोग अंभारे, अरुण पाल, विनोद धोटे, अंकुश भोपये, दिवाकर काचीनावर, दिलीप पा. ठिकरे, पूनम झाडे, जीवन भोयर, के. व्ही. एनगंटीवार, बी. बी. लाटकर, किशोर खेडेकर, सदाशिव सहारे उपस्थित होते.
चिमुरात ओबीसी महासंघाचे धरणेचिमूर : आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी ओबीसी महासंघाने चिमूर तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक प्राचार्य डॉ. अशोक जीवतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली चिमूर तहसील कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना तहसीलदारांमार्फत निवेदन देण्यात आले. धरणे आंदोलनाचे अध्यक्ष गजानन अगडे होते. यावेळी रामदास कामडी, एम. जी. मानकर, डॉ. सतीश वारजुकर, प्रकाश झाडे, ईश्वर डुकरे, अरुण लोहकरे, राजू लोणारे, नरेंद्र बंडे, संजय डोंगरे ,विलास डांगे, प्रा राम राऊत, प्रा. संजय पिठाडे, अविनाश अगडे, विजय डाबरे, कवडू लोहकरे, भावना बावनकर, वर्षा शेंडे , पुष्पा हरणे, उषा हिवरकर, कोमल वंजारी, ममता वंजारी आदी उपस्थित होते.