लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे ओबीसीच्या विविध मागण्यासंदर्भात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे समन्वयक डॉ. अशोक जिवतोडे, महासचिव सचिन राजुरकर यांचे नेतृत्वात निवेदन सादर करण्यात आले.शासन परिपत्रकानुसार ओबीसी विद्यार्थ्यांना १०० टक्के शिष्यवृत्ती देण्यात यावी, व्यावसायिक कोर्स मधील एम. बी. ए., एम. सी. ए., एम. टेक, बी.बी.ए., बी.सी.ए., बी.सी. एस.व नर्सिंग या कोर्सेसना भारत सरकारतर्फे शिष्यवृत्ती मिळत नाही. त्यांना १०० टक्के शिष्यवृत्ती सुरू करण्यात यावी, मागील चार वर्षापासून थकीत असलेली शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी, राज्यात ३६ जिल्ह्यात इतर मागास वर्ग या प्रवर्गातील मुलांसाठी व मुलींसाठी वसतिगृह मंजूर करण्यात आले आहे. वसतिगृहाच्या इमारती पूर्ण होईपर्यंत २०१९-२० या शैक्षणिक सत्रापासून भाड्याच्या इमारतीत वसतिगृह सुरू करावेत, अनुसूचित जाती व जमाती विद्यार्थ्यांकरिता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना लागू करण्यात आली आहे. त्यानुसार ही योजना ओबीसी संर्वगातील विद्यार्थ्यांना लागू करण्यात याव्या, इतर मागास वर्ग आर्थिक विकास महामंडळ लोकसंख्येच्या प्रमाणात निधी वळता करावा आदी मागण्याचे निवेदन पालकमंत्र्यांना देण्यात आले. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात बबनराव फंड, बबनराव वानखेडे, प्रा. नितीन कुकडे, विजय मालेकर, ज्ञानेश्वर महाजन, विनायक साखरकर, बुरडकर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
ओबीसींचे पालकमंत्र्यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2019 10:43 PM
राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे ओबीसीच्या विविध मागण्यासंदर्भात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे समन्वयक डॉ. अशोक जिवतोडे, महासचिव सचिन राजुरकर यांचे नेतृत्वात निवेदन सादर करण्यात आले.
ठळक मुद्देराष्ट्रीय ओबीसी महासंघ : विविध मागण्यांकडे वेधले लक्ष