शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
2
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
4
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
5
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
6
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
8
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
9
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
10
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
11
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
12
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
13
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
14
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
15
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
16
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
17
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
18
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
19
'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण
20
SBI Healthcare Opportunities Fund : २५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न

मुख्यालयी न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे दफ्तर दिरंगाई

By admin | Published: November 28, 2015 2:11 AM

कोरपना तालुक्यातील बहुतेक शासकीय कर्मचारी हे नोकरीच्या ठिकाणी अर्थात मुख्यालय स्थायीक नसून इतर तालुक्यातून अप-डाऊन करीत असतात.

अनेक कामांचा खोळंबा : वणी व राजुरातून कर्मचारी करतात अप-डाऊनकोरपना : कोरपना तालुक्यातील बहुतेक शासकीय कर्मचारी हे नोकरीच्या ठिकाणी अर्थात मुख्यालय स्थायीक नसून इतर तालुक्यातून अप-डाऊन करीत असतात. यामध्ये डॉक्टर, तलाठी, ग्रामसेवक, शिक्षकांपासून सर्वच क्षेत्रातील सरकारी कर्मचाऱ्याचा समावेश आहे. त्यामुळे अनेक कामांचा खोळंबा होत असून नागरिकांना विविध कामे करण्यासाठी कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.सहाव्या वेतन आयोगामुळे शासकीय कर्मचाऱ्यांना दरमहा मोठ्या पगाराची मिळकत होत असल्याने त्यांचे राहणीमान निश्चितच उंचावले आहे. ही बहुतेक मंडळी आपली कुटूंबे पॉश शहरात वास्तव्यास ठेवून दुचाकी वाहनाने ३० ते ४० किमी अंतरावरील आपल्या नोकरीच्या ठिकाणी हजेरी लावत असतात. अशा दैनंदिन प्रवाशी कर्मचाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे आढळून येते. यात शिक्षक वर्ग आघाडीवर असून कोरपना व परिसरातील गावात नोकरीवर असणारे शिक्षक थेट वणी, यवतमाळ, राजूरा व गडचांदूर येथून ये-जा करणारे आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांना शासन घरभाडे भत्ता देत असते. मात्र या भत्त्यास सदर कर्मचारी खरोखरच पात्र आहेत काय, याची शहानिशा करणे येथील वरिष्ठ अधिकारी महत्त्वाचे समजत नाही. किंबहुना, कोरपनाचे वरिष्ठ अधिकारी स्वत:च मुख्यालयी वास्तव्यास राहत नसल्याचा आक्षेप आहे. त्यामुळे ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ असा हा प्रकार तालुक्यात सुरू आहे.दरम्यान, कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने त्यांच्या कामातील दिरंगाई वाढत आहे. ही बाबसुद्धा वरिष्ठ अधिकारी दुर्लक्षित करीत आहेत. कोरपना तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तर चक्क एक चार चाकी वाहनच भाड्याने घेतल्याचे समजते. ही सर्व मंडळी राजुरा ते कोरपना असा सुमारे ४५ किमीचा रोज प्रवास करीत असतात. मुख्यालयी वास्तव्यास नसतानाही त्यांना नियमित घरभाडे भत्ता अदा होत असल्याची माहिती आहे. हे सारे येथील तहसिलदारांना माहित असूनही त्यांना घरभाडे मिळते कसे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.तलाठी सारख्या महत्त्वाच्या पदावर असणारे कर्मचारीसुद्धा बाहेर गावाहून ये-जा करतात. तलाठी साहेबकधी घरून निघालेले असतात मात्र, कार्यालयात पोहचलेले नसतात. दुसरीकडे कार्यालयातूनच आताच बाहेर गेल्याचे सहकारी सांगतात. अशा वेळी गरजुवंतांना सतत हेलपाटे खावे लागतात. या हेलपाट्या व्यतिरिक्त कामाचा मोबदला म्हणून द्यावी लागणारी ‘दक्षिणा’ ती वेगळीच. अर्थात याला येथील काही तलाठी अपवादही आहेत. मात्र त्यांची संख्या नगण्य आहे. (तालुका प्रतिनिधी)