लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : तालुक्यातील गडचांदूर येथील उपविभाग महावितरण कार्यालय येथे सध्या कमालीचा भोंगळ कारभार सुरु असून विविध समस्या व्यतिरिक्त आता कित्येक शेतकरी, शेतमजूर व सर्वसाधारण ग्राहकांना आवाच्यासवा वीज बिल पाठवून वेठीस धरले जात आहे. अस्मानी संकटातून कसाबसा वाचलेला बळीराजा आता महावितरणाच्या सुलतानी संकटात सापडल्याचे दिसत आहे. याठिकाणी अधिकारी मस्त, विज ग्राहक त्रस्त, अशी परिस्थिती पहायला मिळत आसून महावितरणाचे वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष देतील का? असा प्रश्न सर्वसामन्यांना पडला आहे.असाच एक प्रकार नांदाफाटा येथे उजेडात आला असून ग्राहकांना अगोदर दोनशे ते तीनशेच्या जवळपास बिले यायची. परंतु, यंदा कित्येकांना चक्क ७५ ते ८० व ८५ हजारांच्या जवळपास विजबिल आल्याचे दिसत आहे. यामुळे शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्यांना आर्थिक छळ सहन करावा लागत आहे. त्रस्त विज ग्राहकांनी कित्येकदा स्थानिक महावितरण कार्यालयात खेटे मारले मात्र महावितरणचे अधिकारी प्रत्येकवेळा तुम्ही अगोदर बिल भरा, मग पाहु अशी उडवाउडवीची उत्तर दिली जातात. महावितरण उपकार्यकारी अभियंता यांनी विद्युत कायदा, २००३ च्या कलम ५६ (१) नुसार बिल न भरल्यास चक्क विद्युत पुरवठा खंडित करण्याची नोटीसच या ग्राहकांना बजावली आहे.यामुळे वीज ग्राहकांमध्ये संतापाची लाट पसरली असून वरिष्ठांनी सदर प्रकरणाची योग्य चौकशी करावी, दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी नांदाफाटा येथील गायकवाड आणि मोहितकर यांच्यासह इतर त्रस्त विज ग्राहक महावितरणाच्या वरिष्ठांकडे केली आहे. यानंतर वरिष्ठ अधिकार कोणती कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महावितरण कार्यालयाचा भोंगळ कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 12:40 AM
तालुक्यातील गडचांदूर येथील उपविभाग महावितरण कार्यालय येथे सध्या कमालीचा भोंगळ कारभार सुरु असून विविध समस्या व्यतिरिक्त आता कित्येक शेतकरी, शेतमजूर व सर्वसाधारण ग्राहकांना आवाच्यासवा वीज बिल पाठवून वेठीस धरले जात आहे.
ठळक मुद्देहजारोंच्या बिलांमुळे ग्राहक त्रस्त : कनेक्शन कापण्याची नोटीस