: पोंभूर्ण्यातील अधिकारी व कार्यकर्त्यांची घेतली बैठक
घोसरी : सर्वच विभागातील अधिकाऱ्यांनी गोरगरीब जनता, शेतकरी तसेच इतर सर्वसामान्य लोकांना शासकीय काम असो अथवा इतर कोणत्याही कामाला त्रास होता काम नये, अशा सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
ते पोंभूर्णा येथील कार्यकर्ते व अधिकारी यांच्या बैठकीत बोलत होते. यावेळी तहसीलदार नीलेश खटके, वीज वितरण विभागाचे अधिकारी पाटील, ठाणेदार धर्मेंद्र जोशी, बांधकाम विभागाचे अधिकारी टांगले, काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते घनश्याम मुलचंदानी, तालुका अध्यक्ष कवडूजी कुंदावार, गटनेते आतिक कुरेशी, नगरसेवक जयपाल गेडाम, साईनाथ शिंदे, पराग मूलकलवार, ओमेश्वर पदमगिरवार, रवी मारपल्लीवार, प्रशांत झाडे, आनंद पातळे यांची उपस्थिती होती.
शेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासनाच्या प्रत्येक योजनेची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे व शेतकऱ्यांना त्या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. याकरिता उपाययोजना करण्याचे खा. धानोरकर यांनी सांगितले, तसेच गरीब शेतकऱ्यांच्या नावावर दुसल्याला लाभ घेता येणार नाही, याची दक्षता घेण्याचे सांगितले, तसेच वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शेतकरी व सर्वसामान्य जनतेचे वीज कनेक्शन कोणत्याही परिस्थितीत कापू नये, ज्यांचे बिल जास्त आहेत त्यांना टप्पे पाडून द्या, अशा सूचना केल्या.