रवी जवळे
चंद्रपूर : शासनाने नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू केल्या आहेत. जिल्ह्यात असलेल्या ६१७ शाळांपैकी ५१२ शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र या शाळांमध्ये पूर्वीसारखा किलबिलाट अजूनही झालेला नाही. एकूण एक लाख २२ हजार ८४ विद्यार्थ्यांपैकी केवळ २७ हजार ५७५ विद्यार्थी शाळांमध्ये येऊन शिक्षणाचे धडे घेत आहेत. म्हणजेच विद्यार्थ्यांची उपस्थिती केवळ २२.५९ टक्केच आहे.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने मार्च महिन्यांपासून लॉकडाऊन जाहीर केले. हळूहळू लॉकडाऊन शिथिल करण्यात आले. बाजारपेठा उघडल्या. मात्र शाळा, महाविद्यालये बंदच होती. कोरोना काळात लहान मुलांच्या शाळा सुरू करणे उचित नव्हते. त्यामुळे २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा, महाविद्यालये उघडण्याची परवानगी देण्यात आली आणि शाळेची घंटा वाजली. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शाळेमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून थर्मल स्कॅनर, पल्स आॅक्सीमीटर, हात धुण्यासाठी साबन व पाणी आदींची सुविधा ठेवण्यात आली आहे. दोन विद्यार्थ्यांमध्ये सहा फूट अंतर ठेवण्यात येत आहे.
बॉक्स
२७१६७ पालकांनी दिले संमती पत्र
विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचे की नाही, यासाठी पालकांची लेखी संमती असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती बंधनकारक नसून पूर्णत: पालकांच्या संमतीवर अवलंबून असेल, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले होते. त्यानुसार जिल्ह्यातील २७१६७ पालकांनी शिक्षण विभागाला संमतीपत्र दिले आहे.
बॉक्स
३६० शिक्षक पॉझिटिव्ह
शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाºयांनी कोविड-१९ साठीची आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक केले होते. त्यानुसार जिल्ह्यातील आठ हजार ०२ शिक्षकांनी आतापर्यंत कोरोना चाचणी केली आहे. यातील ३६० शिक्षक पॉझिटिव्ह निघाले आहेत.
ग्राफ
एकूण विद्यार्थीउपस्थित विद्यार्थी एकूण शाळा सुरु शाळा एकूण शिक्षकउपस्थित शिक्षक
१२२०८४ २७५७५ ६१७ ५१२ ५४२९ ४००२
कोट
विद्यार्थ्यांच्या चाचणीची गरज नाही. मात्र शाळांच्या प्रवेशद्वारावरच तापमापीद्वारे विद्यार्थ्यांना ताप आहे की नाही, हे बघितले जाईल. ताप असल्यास त्या विद्यार्थ्याला घरी पाठवू. एका बेंचवर एकच विद्यार्थी बसेल. नियमांचे काटेकोर पालन केले जाईल.
-उल्हास नरड,
शिक्षणाधिकारी (माध्यमिक), चंद्रपूर.