चंद्रपूर : शहरातील शासकीय जुन्या इमारतींची दुरुस्ती करून त्याची देखभाल करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. चंद्रपूरात सराई मार्केटसह अन्य इमारती आहे. यासंदर्भात सामाजिक संस्थांनी प्रशासनाला निवेदनही दिले आहे. काही इमारती अतिशय जुन्या झाल्या असतानाही यातूनच शासकीय कारभार हाकला जात आहे.
शिवारात वन्यप्राण्यांचा धुमाकूळ
चंद्रपूर : मूल व चंद्रपूर तालुक्यातील जंगलव्याप्त क्षेत्रात वन्यप्राणी धुमाकूळ घालत आहे. त्यामुळे शेतकºयांना रात्रभर जागून रब्बी पिकांचे रक्षण करावे लागत आहे. वाघ-बिबटसारख्या हिंस्त्र प्राण्यामुळेही शेतकºयांचा जीव धोक्यात आला आहे.
सकाळी बसफेरी
सुरू करावी
कोरपना : आदिवासीबहुल, नक्षलग्रस्त व अतिमागास तालुका म्हणून कोरपन्याची ओळख असली तरी केवळ औद्योगिकदृष्टया तालुक्याची प्रगती झाली आहे. त्यामुळे नगरविस्तार व लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. परंतु कोरपना या तालुकास्तरावरुन अनेक गाव व शहरांसाठी थेट बससेवा व नियोजित वेळेत बस उपलब्ध नसल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
प्रवासी निवारा
बांधण्याची मागणी
चिमूर : शंकरपूर, ब्रह्मपुरी, कान्पा येथे जाण्यासाठी याच फाट्यावर यावे लागते. या फाट्यावर प्रवासी निवारा नसल्याने या परिसरातील नागरिकांना, विद्यार्थ्यांना तासन्तास उभे राहून उन्ह, वारा, पाऊस या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या ठिकाणी प्रवासी निवाºयाची मागणी होत आहे.
अल्ट्राटेक चौकात
गतिरोधक उभारा
गडचांदूर : गडचांदूर शहरातून राजुरा-गोविंदपूर-आदिलाबाद राज्य महामार्गाला राष्टÑीय महामार्गाचा दर्जा मिळाला आहे. गडचांदूर रेल्वे क्रासिंग ते अल्ट्राटेक चौकापर्यंत महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले. या मार्गावरुन दिवसरात्र वाहतूक सुरू असते. मात्र गतिरोधक नसल्याने येथे अपघात होत आहेत. या महामार्गावर असलेल्या राजीव गांधी चौक, संविधान चौक व बाबुराव शेडमाके चौक गतिरोधक नसल्याने वाहने सुसाट वेगाने चालविली जातात. यामुळे अनेकदा अपघात घडले आहेत.