अलीकडेच जिल्ह्यातील दारूबंदी उठल्यामुळे बल्लारपुरातही जुने बार सुरू झाले आहे; परंतु बार खुले ठेवण्याची वेळ सायंकाळी ४ वाजेपर्यंतच असल्यामुळे सध्या पार्सल नेण्याची व्यवस्था सुरू आहे. यामुळे तळीराम दारूचे पार्सल घेऊन सायंकाळी वाट्टेल त्या ठिकाणी आपली मैफल जमवतात. शहरातील महत्त्वाचे ठिकाण असलेल्या वर्धा नदीच्या गणपती घाटावर, तर कधी आता सुनसान पडलेल्या बगिच्यात, नाही तर मोकळ्या जागेत. मात्र, सायंकाळी शहराच्या वेशीवर असलेल्या बामणी-विसापूरच्या ढाब्यावर तळीरामांची दारू पिण्याची खास व्यवस्था असते. मद्य सेवन करणे कायद्यान्वये गुन्हा असूनही या नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे. यासंदर्भात ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी सार्वजनिक ठिकाणी मद्य पिणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा दिला आहे. सायंकाळी शहरातील बार बंद असल्यामुळे अवैध मद्य विक्रेत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मद्य मात्र पूर्वीपेक्षा स्वस्त झाले असल्यामुळे तळीराम खुश आहेत.
कोट
सध्या तळीरामांना शासनातर्फे मद्य पिण्याचा परवाना देण्यात आलेला नाही. आदेशाप्रमाणे बार मालकांतर्फे नमुना एफएल-सी नियम -७० प्रमाणे ५ रुपयांत ७५० मिलि मद्याचे एक युनिट बाळगण्याचा एक दिवसाचा परवाना देण्यात येत आहे.
- प्रेम माकोडे, बार संचालक, बल्लारपूर