संदीप दिवाण : अनेक ज्येष्ठ नागरिकांची उपस्थितीचंद्रपूर : सामाजिक न्याय विभाग यशदा पुणे महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ मुंबई व ज्येष्ठ नागरिक संघ चंद्रपूर यांचे संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांकरिता रविवारला एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या हस्ते पार पडले. तर अध्यक्षस्थानी महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ मुंबईचे अध्यक्ष डी.टी. चौधरी ,न्यायाधीश जिल्हा विधी व सेवा प्राधिकरण चंद्रपूर पी.एस. इंगळे, अॅड. बी.बी. निसळ, कायदेशीर सल्लागार माधव झाडे, अंबादास मोहिते, डी.डी. देशमुख, डॉ.अर्चना ठोंगरे, तज्ज्ञ मार्गदर्शक यशदा पुणे, ना.ना. इंगळे, समाज कल्याण सहायक आयुक्त पी.जी. कुळकर्णी, यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण म्हणाले, मुलांनी आईवडिलांना सांभाळावे, यासाठी कायदा करावा लागतो. यापेक्षा दुर्देवाची बाब नाही. भारत देश हा महापुरुषांचा देश आहे. आपल्याला जे योग्य वाटते ते करावयाचे आनंदी रहा, सुखी रहा स्वत:ला कार्यात व्यस्त ठेवा, आलेली परिस्थिती स्विकारली पाहिजे, स्वत:ला असहाय्य समजू नका असा मोलाचा संदेश त्यांनी दिला.त्यानंतर इंगळे, अंबादास मोहिते, विषयतज्ञ अर्चना ठोंबरे, सहयोगी प्राध्यापक डी.डी. देशमुख आदींनी मार्गदर्शन केले.सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चाललेल्या या कार्यशाळेमध्ये ब्रह्मपुरी, सिंदेवाही, मूल, चिमूर, बल्लारपूर, भद्रावती, वरोरा व जिल्ह्यातील विविध भागातून सुमारे १२०० हून अधिक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. यामध्ये महिलांचा देखील समावेश होता. प्रास्ताविक केशव जेणेकर यांनी केले.कार्यशाळेच्या यशस्वीतेकरिता गोसाई, बलकी, घट्टूवार, अरुण दंतुलवार, मुनशेट्टीवार, मोहन रायपूरे आदींनी प्रयत्न केले.(नगर प्रतिनिधी)
ज्येष्ठ नागरिकांसाठी एक दिवसीय कार्यशाळा
By admin | Published: February 07, 2017 12:37 AM