भद्रावती : नागपूर- चंद्रपूर महामार्गावर झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर दुसऱ्या अपघातात सहा जण जखमी झाल्याची घटना आज शुक्रवारला घडली.एमएच- ३४/४६६२ या क्रमांकाच्या चारचाकी वाहनाचा चालक सेतू माधव मेमन (४८) रा. नांदाफाटा ता.कोरपना हा नागपूरमार्गे चंद्रपूरला जात असताना त्याचे अचानक वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे टाकडी फाट्याजवळ चारचाकी वाहन उलटून ते रस्ता दुभाजक ओलांडून मागून येणाऱ्या ट्रकवर आदळले. त्यात सेतू माधव मेमन याचा जागीच मृत्यू झाला. दुसरी घटना नागपूर-चंद्रपूर मार्गावरील घडली. डीएनआर ट्रॅव्हल्स (क्रमांक एमएच-३४ एव्ही १९७७) ही नागपूरवरून चंद्रपूरकडे जात होती. ट्रव्हल्सचालक कुणाल गोपालसिंग बैस रा. दत्तनगर याने या मार्गावर थांबा नसतानाही ट्रॅव्हल्स थांबविली. त्यामुळे मागून येणाऱ्या एसटीची (क्र. एमएच- ४० वाय- ५२१४) टॅव्हल्सला धडक बसली. या एसटीच्या चालकाचे नाव प्रविण माणिकराव मडावी असे आहे. या अपघातात एसटीमधील प्रवासी प्रताप सिंह बैस (५०) रा. नांदेड, कुनाबाई सिंह बैस (६०) रा. नांदेड, लक्ष्मी प्रताप सिंह बैस (४५), दादाजी बालाजी राऊत (५२), सुभाष मारोती मारबते (४१) रा. गुरुनगर भद्रावती, सुरेंद्र बापूराव भामटे (४४) रा. नंदोरी हे जखमी झाले. जखमींना ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन अपघातांत एक ठार, सहा जखमी
By admin | Published: July 09, 2016 1:08 AM