माजी नगरसेवकाच्या घरी चोरी : राजुरा शहरात चोरांचा धुमाकूळराजुरा : शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरांचा धुमाकूळ सुरू असून देशपांडे वाडी, चुनाभट्टी वार्ड, कर्नल चौक परिसरात चोरीच्या घटना सतत घडत आहेत. कर्नल चौकातील वर्दळीच्या ठिकाणी माजी नगरसेवक अशोक देशपांडे यांच्या घराचा मागील दरवाजा तोडून १ लाख ४० हजारांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. ही घटना मंगळवारच्या रात्री घडली.चोरट्यानी दार तोडून अशोक देशपांडे यांच्या घरून दोन तोड्याचे मंगळसूत्र ४० हजार, तीन तोड्याच्या बांगळ्या ६० हजार, सोन्याचे नेकलेस ४० हजार असा १ लाख ४० हजाराचा माल लंपास केला. दोन महिन्यापूर्वी भाजपा नेते विनायक देशमुख यांच्या घरी चोरी झाली होती. नेमके घरी कुणी नसताना भीक मागण्याच्या हेतुने तर काही साहित्य विकण्याच्या हेतुने घरोघरी फिरून चोरी केली जात आहे. असेच काही नागरिक कर्नल चौक परिसरात फिरत असताना पोलिसांना सुचना दिल्या होत्या. देशपांडे वाडीमध्ये तर २०- २५ चोरीच्या घटना घडल्या असल्याने ठाणेदारापुढे चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भांदवि ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. (शहर प्रतिनिधी)
एक लाख ४० हजारांचे दागिने पळविले
By admin | Published: October 27, 2016 12:46 AM