शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे ते कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
3
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
4
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
5
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
6
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
7
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
8
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
9
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
10
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
11
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
12
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
14
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
15
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
16
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
17
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
18
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
20
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos

एक लाख ७९ हजार ८५७ प्रौढ नागरिकांचे होणार बीसीजी लसीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2024 1:56 PM

Chandrapur : डॉक्टरांनी स्वतः लस घेत केली बीसीजी लसीकरणाची सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : जिल्हा परिषद आरोग्य विभागाअंतर्गत येणाऱ्या दुर्गापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रौढ बीसीजी लसीकरणाची सुरुवात करण्यात आली. विशेष म्हणजे यावेळी स्वतः डॉक्टरांनी लस घेऊन लसीकरणास सुरुवात झाली. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील एक लाख ७९ हजार ८५७ प्रौढ नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन वैद्यकीय अधिकारी डॉ. बंडू रामटेके यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी माता बाल संगोपन अधिकारी डॉ. प्राची नेहुलकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. ललित पटले, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रीती राजगोपाल, डॉ. माधुरी मेश्राम व उज्ज्वला सातपुते आदी उपस्थित होते. बीसीजी लस जन्मतः बाळाला देत असल्यामुळे ती पूर्णतः सुरक्षित व उपयुक्त आहे.

बीसीजी लस लहान मुलांप्रमाणेच प्रौढ व्यक्तींसाठीही उपयुक्त ठरते आहे. जिल्ह्यात अतिजोखमीच्या गटातील लस घेण्यासाठी संमती दिलेल्या टीबी-वीन पोर्टलवर नोंदणी केलेल्या एक लाख ७९ हजार ८५७ प्रौढ व्यक्तींचे लसीकरण करण्यात विनय गौडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली गावागावांत उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र व महानगर पालिकेच्या आरोग्य केंद्रात स्वतंत्र बीसीजी लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. 

त्यामुळे लसीकरण करणे सोयीचे होईल. देश क्षयरोगमुक्त होण्यासाठी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे यांनी केले आहे. चंद्रपूर मनपा क्षेत्रातही मनपातर्फे ही लस देण्यात येत आहे. पात्र लाभार्थ्यांनी ही लस घ्यावी, असे आवाहन मनपाचे आयुक्त विपीन पालिवाल यांनी केले आहे. 

"राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत वर्ष २०२५ पर्यंत देशाला क्षयरोगमुक्त करण्याचा केंद्र शासनाचा संकल्प आहे. त्यानुसार जिल्ह्यात १८ वर्षावरील प्रोंढ व्यक्तींना बीसीजी लस देण्यात येईल. या मोहिमेत जिल्ह्यातील एक लाख ७९ हजार ८५७ प्रौढ व्यक्तींचे लसीकरण करण्यात येणार आहे. टीबीचा उपचार घेणारे रुग्ण, ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, मधुमेह, धूम्रपान करणारे यासोबतच ज्यांचा बॉडी मास इंडेक्स १८ पेक्षा कमी आहे, अशा व्यक्तींनी लस घ्यावी. तर १८ वर्षापेक्षा कमी वयाचे, एचआयव्हीग्रस्त, गरोदर व स्तनदा माता यांनी लस घेऊ नये." - डॉ. ललित पटले, जिल्हा क्षयरोग अधिकारी, चंद्रपूर

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर