लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या महिन्याभरात बाहेर राज्यात, अन्य जिल्ह्यांमध्ये शिक्षण नोकरी व रोजगारासाठी बाहेर असणाऱ्या जवळपास ३३ हजारावर नागरिकांची नोंद झाली आहे. लॉकडाऊननंतर परवानगी घेऊन नागरिक आले आहेत. यापैकी ३१ हजार १३८ नागरिकांनी १४ दिवसांचा विलगीकरनाचा अर्थात होम क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण केला आहे. २५५० नागरिक सध्या हा कालावधी पूर्ण करीत आहेत. बाहेरून येणाºया नागरिकांकडूनच धोका असल्याने माहिती लपवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.बाहेरून येणाऱ्या नागरिकांबाबत पोलीस प्रशासन अतिशय सक्त असून प्रत्येकाची तपासणी केली जात आहे. ही तपासणी आपल्या स्वत:साठी व कुटुंबासाठी आवश्यक आहे. त्यामुळे सगळ्याच यंत्रणेला चुकवून जरी कोणीही जिल्ह्याच्या कोणत्याही भागात वा शहरात पोहोचले असेल तर सामाजिक दायित्व म्हणून स्वत:ची माहिती आरोग्य विभागाला देण्याबाबतचे आवाहन करण्यात आले आहे.कोटा येथे विविध परीक्षांची तयारी करण्यासाठी गेलेले जिल्ह्यातील ३९ विद्यार्थी अडकून पडले आहेत. या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी राज्य शासनाने तयारी सुरू केली असून त्याचा लाभ चंद्रपूर येथील विद्यार्थ्यांनाही मिळेल, अशी अपेक्षा आहे.सध्या ३ मेपर्यंत लॉकडाऊन असून यात कोणतीही शिथिलता देण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांना आवश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी.१०३५ वाहने जप्तनियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांविरुध्द जिल्हा प्रशासनाने कारवाई करत जिल्ह्यातील २९२ प्रकरणात एकूण १५ लाख ७० हजार ८७० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये नियमांचे पालन न करणाऱ्या ५८ नागरिकांना अटक करण्यात आली आहे. तर एक हजार ३५ वाहने जप्त केली आहेत. प्रशासनाने वेळोवेळी जारी केलेले नियम व सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द आणखी कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.कर्मचाऱ्यांनी कर्तव्यस्थळी रुजू व्हावेलॉकडाऊन लागल्यापासून अनेक कर्मचारी कार्यालयात पोहोचले नाही. अशा कर्मचाऱ्यांनी तातडीने आपापल्या कार्यालयात रुजू होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश काढले आहेत. या काळात नियमित कामकाज सुरू करण्यात यावे, पोलीस विभागाची परवानगी घेऊन कर्तव्यस्थळी रुजू व्हावे, असे आवाहन करण्यात आले.रोड झोनमधून येऊ नयेनागपूर व यवतमाळ हे दोन जिल्हे रेड झोनमध्ये असून भंडारा जिल्ह्यांमध्येदेखील रुग्ण आढळला आहे. त्यामुळे या जिल्ह्याच्या सीमेवरून प्रवेश करताना विनापरवाना कोणालाही आत प्रवेश दिला जात नाही. नाकाबंदी आणखी कडक करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने पोलिसांना दिले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होवू नये, यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे. यासाठी पोलिसांचा रुट मार्च काढण्यात आला.जिल्हाभरात सारी व आयएलआयची तपासणीकोरोनासोबतच आयएलआय आणि सारी यांचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रशासनातर्फे युद्धस्तरावर अॅक्शन प्लॅन राबविला जात आहे. प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली वस्ती, डेपो, टेकडी, झोनमध्ये नगरपरिषद कर्मचारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका,आशा वर्कर, आरोग्यसेविका तथा विविध कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची शहराचे सर्वेक्षण करण्यासाठी नेमणूक करून वार्डनिहाय पथकाचे गठन करण्यात आले आहे. बल्लारपूर शहरामध्ये आज घरोघरी जाऊन सर्दी, खोकला, ताप, घसा दुखी असणाºया तसेच बाहेर देशातून बाहेर जिल्ह्यातून येणाºया नागरिकांचा सर्वे करून नोंदी घेण्यात आल्या. प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांची फॉर्म नंबर ८ मध्ये माहिती भरून आरोग्य विभागाकडे पाठवून त्यांची तपासणी करण्यात येत असून त्यांना क्वॉरन्टाईन करण्यात येत आहे. तसेच व्यापारी, दुकानदार, ठोक तसेच चिल्लर भाजी विक्रेते यांची थर्मल स्कॅनरद्वारे टेंपरेचर तपासणी मोहीमसुद्धा राबविण्यात येत आहे.केशरी शिधापत्रिकाधारकांना धान्य वाटप सुरूजिल्ह्यामध्ये एपीएल अर्थात केशरी शिधापत्रिकांची संख्या ४७ हजार ३७३ आहे. जिल्ह्यात २४ एप्रिलपासून केशरी शिधापत्रिकाधारकांना प्रतिव्यक्ती आठ रुपये दराने तीन किलो गहू व प्रतिव्यक्ती १२ रुपये दराने दोन किलो तांदूळ वाटप सुरू आहे. आतापर्यंत ७४८.२३ क्विंटल गहू तर ४९८.०७ क्विंटल तांदूळ वाटप झाले आहे. गहू व तांदूळाचे एकूण १२४६.३० क्विंटल वाटप झाले आहे. केशरी शिधापत्रिकाधारकांनी आपल्या धान्याची उचल करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र मिस्कीन यांनी केले आहे.
एका महिन्यात ३३ हजार नागरिक स्वगृही दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 5:00 AM
बाहेरून येणाऱ्या नागरिकांबाबत पोलीस प्रशासन अतिशय सक्त असून प्रत्येकाची तपासणी केली जात आहे. ही तपासणी आपल्या स्वत:साठी व कुटुंबासाठी आवश्यक आहे. त्यामुळे सगळ्याच यंत्रणेला चुकवून जरी कोणीही जिल्ह्याच्या कोणत्याही भागात वा शहरात पोहोचले असेल तर सामाजिक दायित्व म्हणून स्वत:ची माहिती आरोग्य विभागाला देण्याबाबतचे आवाहन करण्यात आले आहे.
ठळक मुद्देजिल्हाधिकारी : आजारी असेल तर तपासणी करा; धोका पत्करू नका