लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चाऱ्याबाबत टंचाईसदृश्य परिस्थिती बघता जनावरांसाठी चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावा, याकरिता शासनाने गाळपेर जमिनीचा सदुपयोग करण्याचा निर्णय घेतला आहे. आता शेतकऱ्यांना नाममात्र एक रुपये हेक्टर दराने चारा पिकांसाठी जमीन उपलब्ध होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात १२ तालुक्यांमध्ये तीन हजार २५६ हेक्टर जमीन गाळपेर क्षेत्र असून यासाठी शेतकऱ्यांनी पंचायत समितीतील पशुधन अधिकारी (विस्तार) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.तलाव व पाणीसाठा क्षेत्रातील पाणी उतरल्यानंतर सुपीक जमिनीला गाळपेर क्षेत्र म्हणतात. याचा वापर करण्याचे शासनाने धोरण जाहीर केले आहे. जिल्ह्यात काही भागांमध्ये टंचाईसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे.दरवर्षीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे चारा पिकात घट झालेली आहे. त्यामुळे पशुधन करता लागणारा चारा उन्हाळ्याच्या दिवसात मुबलक प्रमाणात उपलब्ध होणे जिकरीचे जाणार आहे.अशा परिस्थितीवर उपाययोजना म्हणून शासनाकडून एक रुपया प्रति हेक्टर या नाममात्र दरावर, प्रकल्पाच्या किंवा जलाशयाच्या काठावरील जागा, काठावरील जमीन ही वैरण लागवडीकरिता उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच या पिकांकरिता आवश्यक असलेले पाणी लगतच्या तलावातून विनामूल्य उपासा करण्याकरिता उपलब्ध केले जाणार आहे.चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सावली, नागभीड, सिंदेवाही, चिमूर, मूल, पोंभूर्णा, बल्लारपूर, गोंडपिंपरी, राजुरा, वरोरा, ब्रह्मपुरी, चंद्रपूर अशा १२ तालुक्यांमध्ये तीन हजार २५६ हेक्टर जमीन उपलब्ध आहे. या तालुक्यांमधील प्रकल्पालगतच्या उपलब्ध जमिनीची माहिती पंचायत समितीमध्ये पशुसंवर्धन अधिकाºयाकडे मिळेल. जलसंपदा विभागाकडून या संदर्भातील जमिनी उपलब्ध केली जाणार आहे.शासनाच्या या निर्णयामुळे शेतकरी व पशुपालकांची चिंता कमी झाली असून त्यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.जमिनीसाठी अर्ज करागाळपेर जमिनीसाठी अर्जदारांनी ४ डिसेंबरच्या आत या संदर्भात अर्ज पंचायत समितीमध्ये सादर करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. शेतकऱ्यांची निवड करताना शासन निर्णयातील प्राधान्यक्रम विचारात घेऊन अंमलबजावणी करण्यात येईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.गुरांच्या चाऱ्याची उपलब्धता ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे, अशा ठिकाणी शेतकऱ्यांना चारा उत्पादन करण्यासाठी जमिनी उपलब्ध करुन दिल्या जातील. यासाठी शासनाकडून मोफत बियाणे उपलब्ध होणार आहे.- कुणाल खेमणार,जिल्हाधिकारी, चंद्रपूर
चारा पिकांसाठी एक रुपयात जमीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 9:59 PM
लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : चाऱ्याबाबत टंचाईसदृश्य परिस्थिती बघता जनावरांसाठी चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावा, याकरिता शासनाने गाळपेर जमिनीचा ...
ठळक मुद्देगाळपेर जमिनीचा सदुपयोग : चारा टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न