परिमल डोहणेलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी सन २०२०-२०२१ या सत्राची महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात यावी, असे पत्र गोंडवाना विद्यापीठाने महाविद्यालयीन प्राचार्यांना नुकतेच पाठविले आहे. त्यामुळे मोठ-मोठ्या महाविद्यालयात प्रवेशांसाठी रांगेत लागण्याचा त्रासापासून विद्यार्थ्यांची मुक्ती होणार आहे.नुकताच बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. लवकरच विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेचे वितरण करण्यात येणार आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशाची चिंता सतावत असून प्रवेशासाठी धावपळ सुरु केली आहे. मात्र दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनांकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर महाविद्यालयानी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन राबविण्यात यावी, असे पत्र राज्यपालांनी विद्यापीठांना पाठवले होते. त्यामुळे विद्यापीठांनी संबंधित प्राचार्यांना पत्र पाठवून ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी आपल्या स्तरावर तयारी करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यामुळे आता महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याने विद्यार्थ्यांना रांगेत लागण्याचा त्रासापासून मुक्ती मिळणार आहे.विद्यापिठाला पाठवावा लागणार अहवालसन २०२०-२०२१ या शैक्षणिक सत्रासाठी वेळापत्र जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यासाठी आपल्या स्तरावर व्यवस्था करावी, तसेच तसा अहवाल विद्यापिठांना पाठवावा, अशा सुचनाही विद्यापीठांनी प्राचार्यांना पाठविलेल्या पत्रातून दिल्या आहेत.कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्याबाबत राज्यपालांनी सुचना दिल्या आहेत. त्यानुसार सर्व महाविद्यालयांना पत्र निर्गमित केले आहे.-डॉ. ए. झेड. चिताडे,कुलसचिव (प्र).गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली