राजू गेडाम
मूल : कोरोनाचा गेल्या दोन वर्षापासून प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्यांना शिक्षणात अखंडतेचा सामना करावा लागत आहे. ऑनलाईन शिक्षण असले तरी अभ्यासाव्यतिरीक्त शिक्षणाने मौलिक विचार करायला भाग पाडले जाते. हेच हेरून मॅजिक बस या संस्थेने चंद्रपूर जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील विविध सामजिक, बौधिक विषयावर विविध उपक्रमातून शिक्षण दिले जात आहे. सदर उपक्रमामुळे विद्यार्थीवर्गात उत्साह दिसून येत आहे. ३३२ गावात विद्यार्थ्याच्या बौद्धिकतेला चालना देण्यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरु असल्याने कोरोना काळात पालकवर्गानी समाधान व्यक्त केले आहे.
कोरोना काळात विद्यार्थ्याना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मॅजिक बस संस्थेचे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनात व नियंत्रणात चंद्रपूर जिल्ह्यातील मूल, सावली, चंद्रपूर, राजुरा, कोरपना, जिवती, बल्लारपूर, पोंभुर्णा, गोंडपिपरी इत्यादी तालुक्यातील शाळांमध्ये स्केल कार्यक्रमा अंतर्गत १२ ते १६ वर्षे वयोगटातील ३८,००० विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळाद्वारे शिक्षण व जीवन कौशल्य विकास हा कार्यक्रम मागील दोन वर्षापासून अविरतपणे राबविला जात आहे. सध्याच्या परिस्थितीत कोरोना महामारीमुळे शाळा बंद आहेत. तेव्हापासून मॅजिक बस संस्थेच्यावतीने पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने जीवन कौशल्य शिकविण्याचे कार्य मात्र सातत्याने सुरू आहे. त्यामागील मुख्य हेतू असा की विद्यार्थ्यांमध्ये जीवन कौशल्य रुजावित व शाळेतील मुख्य विषयांमध्ये मुख्यतः भाषा, गणित, विज्ञान इत्यादी विषयांच्या अध्ययनात खंड पडू नये. या हेतूने मॅजिक बस संस्थेचे कर्मचारी व गावातील समुदाय समन्वयक सतत्याने प्रयत्नशील आहेत.
हा अभिनव उपक्रम यशस्वी करण्याकरिता मॅजिक बस संस्थेतील संपूर्ण तालुक्याचे तालुका समन्वयक निकिता ठेंगणे, योगेश मोरे, सुपडा वानखेडे, नितेश मालेकर, हिराचंद रोहनकर, तसेच संपूर्ण ०९ तालुक्यातील ३० शाळा सहायक अधिकारी व गावातील ३३२ समुदाय समन्वयक हे परिश्रम घेत असल्याचे दिसून येते.
बॉक्स
या बाबी शिकविल्या जातात
विद्यार्थ्यांना अभ्यास कोपरा तयार करायला सांगणे, प्रत्येक सत्रानंतर गृहपाठ देणे, पाढे पाठांतर करायला सांगणे, गणितीय क्रिया सोडवणे,सूत्र पाठांतर करून घेणे आणि विद्यार्थी या सगळ्या गोष्टी करत आहेत की नाही, याचा फोन द्वारे पाठपुरावा घेणे, पालकांशी विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबाबत चर्चा करणे इत्यादी या अभिनव उपक्रमाचे महत्वपूर्ण घटक आहे. या सगळ्या बाबीना विद्यार्थी व पालक उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहे.वरील कार्यक्रम चंद्रपूर जिल्ह्यातील ०९ तालुक्यातील ३३२ गावांमध्ये ३८,००० विद्यार्थ्यांसोबत राबविण्यात येत आहे.