शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

जप्त वाहनांना नंबरप्लेटच्या फोटोवर ‘ऑनलाईन पियुसी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2020 5:00 AM

चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या एका कार्यकर्त्याने एमएच ०४ जी ५५०६ क्रमांकाच्या बसच्या मागील बाजूच्या नंबरप्लेटचा फोटो काढून पियुसी काढण्यासाठी शासन मान्यता असलेल्या एका पियुसी केंद्रात नेला. सबंधित पियुसी केंद्रचालकाने वाहन आणले वा नाही चौकशी न करताच त्या व्यक्तीला एमएच ०४ जी ५५०६ क्रमांकाच्या वाहनाची ऑनलाईन पियुसी (पोलुषण अंडर कंत्रोल सर्टिफिकेट) देण्याचा प्रताप केला.

ठळक मुद्देचंद्रपूरात पियुसीचा गोरखधंदा : आरटीओत व पोलिसात जप्त वाहनांनाही ‘ऑनलाईन पीयुसी’

राजेश भोजेकर।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य शासनाच्या ऑनलाईन पियुसीला चंद्रपूरात थेट आव्हान दिल्या जात असल्याचा गंभीर प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला आहे. दोन वाहनांचा वेगवेगळ्या पियुसी केंद्रावर वाहन न नेता केवळ नंबरप्लेटचा फोटो देऊन ‘ऑनलाईन पियुसी’ मिळाली आहे. वास्तविक, ही दोन्ही वाहने वेगवेगळ्या ठिकाणी जप्त आहे. एक वाहन चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात चार महिन्यांपासून तर दुसरे वाहन रामनगर पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्यान्वये जप्त आहे.चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या एका कार्यकर्त्याने एमएच ०४ जी ५५०६ क्रमांकाच्या बसच्या मागील बाजूच्या नंबरप्लेटचा फोटो काढून पियुसी काढण्यासाठी शासन मान्यता असलेल्या एका पियुसी केंद्रात नेला. सबंधित पियुसी केंद्रचालकाने वाहन आणले वा नाही चौकशी न करताच त्या व्यक्तीला एमएच ०४ जी ५५०६ क्रमांकाच्या वाहनाची ऑनलाईन पियुसी (पोलुषण अंडर कंत्रोल सर्टिफिकेट) देण्याचा प्रताप केला. ही पियुसी ‘लोकमत’च्या हाती लागली. ‘लोकमत’ने या वाहनाची चौकशी केली असता एमएच ०४ जी ५५०६ क्रमांकाचे वाहन १९ मार्च २०२० पासून चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात जप्त असल्याचे दिसून आले. एखाद्या केंद्रावर हा प्रकार घडू शकतो म्हणून ‘लोकमत’ने याची शहानिशा करण्याकरिता दुसऱ्या पियुसी केंद्रावर रामनगर पोलिसांनी दारूबंदी कायद्यान्वये जप्त केलेल्या एचएच ४९ यु ९२२४ या क्रमांकाच्या वाहनाच्या नंबरप्लेटचा फोटो काढून नेला असता पियुसी केंद्रचालकाने वाहन आणले वा नाही कुठलीही चौकशी न करताच ‘ऑनलाईन पियुसी’ दिली. अन्य केंद्रावर दलालांमार्फत नंबरप्लेटचा फोटो दाखवून आॅनलाईन पियुसी सहज मिळत असल्याचे कळले.‘लोकमत’ वृत्ताने बंद झाली ऑफलाईन पियुसीगेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात चंद्रपूरातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाहनांना केवळ क्रमांक दाखवून ऑफलाईन पियुसी दिल्याचे पुढे आले होते. ही बाब लोकमतने उजागर केली होती. अखेर राज्याच्या परिवहन विभागाने हा गोरखधंदा बंद करण्यासाठी ‘आॅनलाईन पियुसी’चा पर्याय पुढे आणला. या ‘आॅनलाईन पियुसी’लाही चंद्रपूरातच छेद देण्याचा प्रकार सुरू असल्याचे दिसून आले.वायु प्रदूषणात भर घालणारा प्रकारप्रदूषणमुक्त वाहने रस्त्यावरून धावावी म्हणून शासनाने बीएस-४ वाहनांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. शिवाय जी वाहने रस्त्यावरून धावत आहे. त्या प्रत्येक वाहनांना दर सहा महिन्यांनी पियुसी काढावी लागते. वाहनाच्या तपासणीअंती केंद्रसंचालक पियुसी देते.मार्चमध्ये प्रवाही घेऊन जाताना चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने काही कागदपत्रांच्या कारणावरून एचएच ०४ जी ५५०६ हे जप्त केले. लॉकडाऊनमुळे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शिंदे यांनी वाहन सोडले नाही. अजूनही वाहन चंद्रपूर आरटीओच्या आवारातच उभे आहे.- प्रकाश कवडूजी डाहुले,वाहन मालक, वणी जि. यवतमाळ.चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अनेक गंभीर तक्रारी येत आहे. त्याच अनुषंगाने स्टिंग ऑपरेशन केले. एका कार्यकर्त्याने आरटीओच्या आवारात जप्त वाहनाच्या क्रमांकाचा फोटो काढून तो एका पियुसी केंद्रावर नेला. केंद्र चालकाने वाहन न पाहताच केवळ नंबरप्लेटच्या आधारे आॅनलाईन पियुसी दिली. हा प्रकार धक्कादायक आहे. मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार आहे.- किशोर जोरगेवार, आमदार, चंद्रपूर.ऑनलाईन पियुसीसाठी पियुसी केंद्रावर गाडी न्यावी लागते. मशीनच्या माध्यमातून वाहनाच्या तपासणीअंती ऑनलाईन पियुसीची स्लीप मिळते. त्या स्लीपवर गाडीचा क्रमांक येतो. एमएच ०४ जी ५५०६ हे वाहन आरटीओ कार्यालयात जप्त असताना पियुसी दिली असेल तर संबंधित पियुसी केंद्रावर नक्कीच कारवाई करणार.- व्हि. व्हि. शिंदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, चंद्रपूर.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसPoliceपोलिस