वेबिनारमध्ये मार्गदर्शन करताना वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. विजयता सोलंकी यांनी वारंवार उद्भवणाऱ्या दुष्काळ परिस्थितीवर मात करण्यासाठी अत्यंत प्रभावी उपाय म्हणून साधारण व्यक्तीदेखील आपल्या शेतात व घरावर राबवू शकेल व कमी खर्चात पूर्ण होऊ शकेल, अशा उपाययोजना म्हणजे विहीर, विंधन विहीर पुनर्भरण व छतावरील पाऊस पाणी संकलनाद्वारे भूजल पुनर्भरण करता येऊ शकते, असे त्या म्हणाल्या. भविष्यकाळात पावसाच्या पाण्याचे व छतावरील पाण्याचे पुनर्भरण करणे अत्यंत गरजेचे आहे. दुष्काळाची भीषण परिस्थिती टाळण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने पुनर्भरण करणे म्हणजेच भविष्यातील पाणीसाठे निर्माण करणे होय. संचालन कुणाल इंगळे यांनी केले. वेबिनार यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी वरिष्ठ भूवैज्ञानिक,भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा, चंद्रपूर कार्यालयाचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले.
‘भूजल पुनर्भरण-एक लोक चळवळ’ विषयावर ऑनलाईन वेबिनार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2021 4:21 AM