बॉक्स
वाहकचालक घेताहेत काळजी
बसमध्ये वाहकचालक मास्क घालून आढळून आले. तसेच त्यांच्याजवळ सॅनिटायझरसुद्धा आढळून आले. प्रवाशांना गर्दी टाळण्याच्या सूचना देऊनसुद्धा प्रवासी ऐकत नसल्याचे चित्र बघावयास मिळाले. जास्त प्रवासी झाल्याने प्रवाशांना उतरण्यास सांगितल्यास आम्हाला अर्जंट काम आहे. म्हणून जबरदस्तीने बसमध्ये चढत असल्याचे चित्र आहे. यामुळे बऱ्याचदा वाहक व प्रवाशांमध्ये वाद होत असल्याचे दिसून आले.
------
बॉक्स
प्रत्येक बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी
चंद्रपूर बसस्थानकावर मोठ्या प्रमाणात प्रवासी बसत असतात. त्यामुळे बसफेऱ्या फुल्ल भरून धावत असतात. त्यानंतर प्रत्येक टप्प्यावर जेथे बसथांबा असेल, तेथे बस थांबते, यावेळी काही प्रवासी उतरतात, तर तेवढ्याच तुलनेत प्रवासी चढत असतात. त्यामुळे संपूर्ण प्रवासात बसमध्ये गर्दीच असल्याचे चित्र आहे. त्यामुळे यावर निर्बंध लावणे गरजेचे आहे.