लोकमत न्यूज नेटवर्कगडचांदूर : कोसुंबी येथील आदिवासी देऊ कुडमेथे यांची शेतजमीन माणिकगड कंपनीने कोणतीही भूसंपादनाची प्रक्रिया न करता व कुठलाही मोबदला न देता आपल्या कब्जात घेतली व त्या ठिकाणी चुनखडीचे उत्खनन केले जात आहे. यामुळे कुडमेथे कुटुंब उघड्यावर आले असून त्यांनी याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली आहे.कौसुंबी येथे १९८४ मध्ये चुकीच्या पद्धतीने सदर कंपनीने जमीन भूसंपादित केली. यात अनेक आदिवासी कुटुंबावर अन्याय झाला आहे. बोकडडोह माईन्समध्ये निवासी गाळे अकृषक न करता तब्बल ३५ वर्षांचा शासनाचा स्वामीत्वधन कंपनीने भरला नाही.महसूल भूमापन मोजणी व सीमांकनापेक्षा अधिक जागेवर कंपनीने अतिक्रमण केले आहे. दरम्यान, देऊ कुडमेथे व भिमा पग्गू यांची खासगी जमीनही कुठलाही मोबदला न देता माणिकगड कंपनीने संपादित केली आहे. त्यामुळे या कुटुंबांवर उपासमारीची पाळी आली आहे. दरम्यान, कंपनीने जमीन बळकावल्याची तक्रार कुडमेथे यांनी पोलिसात केली असून आता ते न्यायासाठी धडपडत आहेत.
कुटुंब उघड्यावर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2018 11:17 PM