शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
5
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
6
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
7
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
8
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
9
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
10
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
11
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
12
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
13
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
14
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
15
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
16
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
17
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
18
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
19
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
20
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

खासदार चषक विदर्भस्तरीय पुरूष कबड्डी सामन्यांचे उद्घाटन

By admin | Published: November 29, 2015 2:01 AM

केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या संयोजकत्वात तसेच सन्मित्र मंडळ चंद्रपूर व सत्शील बहुउद्देशीय मंडळ चंद्रपूर ....

चंद्रपूर : केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या संयोजकत्वात तसेच सन्मित्र मंडळ चंद्रपूर व सत्शील बहुउद्देशीय मंडळ चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कालिदास अहीर स्मृतिप्रीत्यर्थ ‘खासदार चषक २०१५’ ६५ किलो वजन गट विदर्भस्तरीय (पुरूष) तीन दिवसीय भव्य कबड्डी सामन्याचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी पार पडला. या सामन्याचे विधीवत उद्घाटन दीप प्रज्वलनाने मान्यवर अतिथींच्या हस्ते पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. नाना शामकुळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर राखी कंचर्लावार, सन्मित्र मंडळाचे अध्यक्ष डॉ. बबनराव अंदनकर, भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष विजय राऊत, उपमहापौर वसंत देशमुख, भाजपा नेते प्रमोद कडू, भाजपा जिल्हा सरचिटणीस राजेश मून, वासुदेवराव कोतपल्लीवार, भाजपा मनपा गटनेते अनिल फुलजेले, झोन सभापती अंजली घोटेकर, अनिल शिंदे, चंद्रपूर कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष अशोक मोरे, सचिव दिलीप रामेडवार, आंतरराष्ट्रीय खेळाडू अनिल माळवे, सुभाष कासनगोट्टूवार, नगरसेवक रामू तिवारी, धनंजय हूड, राजेंद्र अडपेवार, मोहन चौधरी, राजू खांडेकर, रघूवीर अहीर, वनश्री गेडाम, विलास जागेकर आदी प्रभृतींची उपस्थिती होती.प्रारंभी स्वागत गीताने अतिथींचे स्वागत करण्यात आले. मंडळाच्या माध्यमातून अतिथींचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. आपल्या अध्यक्षीय भाषणातून आ. नाना शामकुळे यांनी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या क्रीडा विषयक भूमिकेची प्रशंसा केली. त्यांनी अगदी सुरूवातीपासूनच विविध क्रीडा प्रकारांना चालना देण्याचे कर्तव्य पार पाडले आहे असे सांगत आजही राजकीय क्षेत्रात कार्य करीत असताना क्रीडा वाढीला प्रोतसाहन देत विविध प्रकारच्या क्रीडा प्रकाराशी संबंधीत खेळाडूंना त्यांच्या क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन करण्याची संधी देण्याचा प्रयत्न त्यांनी सदोदित चालविला आहे. आयोजकांनीमंडळांनी अतिशय परिश्रमातून हे आयोजन करून विदर्भस्तरीय कबड्डी सामने आयोजित करून शहरी व ग्रामीण भागातील क्रीडा पटूंना संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे कौतुक केले. यावेळी त्यांनी स्पर्धेत सहभागी सर्व मंडळांना यशाच्या शुभेच्छा दिल्या.महापौर राखी कंचर्लावार यांनी या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त करून अशा सामन्यांच्या माध्यमातून खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न होतो व या संधीचे सोने करून अनेक खेळाडू राष्ट्रीयस्तरापर्यंत मजल मारतात असे सांगितले. या खेळाडूंमधूनही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कबड्डी स्पर्धक निपजतील अशा शुभेच्छा देऊन जानेवारी २०१६ मध्ये खासदार चषकच्या धर्तीवर महापौर चषक कबड्डी सामने आयोजित करण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. प्रमोद कडू, राजेश मून यांची समयोचित भाषणे झाली.उद्घाटनपर कार्यक्रमात एकूण आठ सामने घेण्यात आले. यात सन्मित्र क्रीडा मंडळ चंद्रपूर विरूद्ध इंदिरा क्रीडा मंडळ बल्लारपूर यांच्यात अटीतटीचा सामना होवून सन्मित्र क्रीडा मंडळाने बाजी मारली तर जयश्रीराम क्रीडा आखाडा बल्लारपूर व पुलगाव क्रीडा मंडळ यांच्यात झालेल्या सामन्यात बल्लारपूरची चमू विजयी घोषित करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनोद काळे, संचालन मोरे यांनी तर आभार मनोज पुलगमकर यांनी मानले. या कबड्डी सामन्यामध्ये नागपूर, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा जिल्ह्यातील विविध मंडळाचे खेळाडू सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता धनंजय हुड, विनोद शेरकी, अमित लडके, रवींद्र शेरकी, किशोर कुडे, मनोज शेरकी, भाजर रोहणे, सचिन ठाकरे, प्रमोद डाखोरे, महेंद्र व्याहाडकर, संभा खेवले, संतोष दंडेवार, प्रमोद डंभारे, समिर चाफले, श्याम चाफले व मंडळाचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. (प्रतिनिधी)