लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी मंगळवारी सायंकाळी शहरातील दारु विक्रेत्यांकडे छापे घातले. ऐनवेळी राबविण्यात आलेल्या मोहिमेमुळे दारुविक्रेत्यांची चांगलीच धावाधाव झाली. यावेळी सात विक्रेत्यांवर कारवाई करीत १२ जणांना अटक केली.जिल्हा मागील तीन वर्षांपूर्वी दारुबंदी करण्यात आली. मात्र आजही शहरात मोठ्या प्रमाणात दारुविक्री केली जाते. अनेकांनी अनेक ठिकाणी कारवाई करुन दारुविक्रेत्यांना अटक करुन दारुसाठा जप्त केला. मात्र पुन्हा कारागृहातून सुटून आल्यानंतर हे आरोपी दारुविक्रीचा व्यवसाय करतात.परिणामी दिवसागणिक दारुविक्रेत्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी दारुबंदीचा आढावा घेऊन स्वत: छापा टाकण्याचा निर्णय घेतला.डॉ. रेड्डी यांनी मंगळवारी सायंकाळी शहरातील बंगाली कॅम्प इंदिरानगर, जुनोना चौक आणि अन्य ठिकाणी स्वत: छापे घातले. त्यामुळे दारुविक्रेत्यांची चांगलीच धावा धाव झाली.यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक हेमराज राजपूत, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक, रामनगरचे पोलीस निरीक्षक दीपक गोतमारे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगत, दुर्गापूरचे पोलीस निरीक्षक यादव उपस्थित होते.पडोलीत अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त, एकास अटकचंद्रपूर : चारचाकी वाहनातून दारुची तस्कारी होत असल्याची माहिती पडोली पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारावर पोलिसांनी नाकाबंदी करुन ३५ हजार रुपयांची दारु व चारचाकी वाहन असा दोन लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी प्रशांत अंबादास मसराम (२४) रा. मातानगर चौक, भिवापूर वॉर्ड चंद्रपूर याला अटक करण्यात आली. चारचाकी वाहन क्र. एम.एच-३१ सीएम ९९९८ या पांढऱ्या क्रमाकांच्या वाहनातून दारुसाठा चंद्रपूर शहरात नेत असल्याची माहिती पडोली पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारावर नागपूर- चंद्रपूर मार्गावरील पडोली चौकात नाकाबंदी करुन सदर वाहनाची झडती घेतली असता, मागील डिक्कीलगत असलेल्या बफरच्या आत देशी दारुच्या ३५ हजार रुपये किंमतीच्या ७०० बॉटल्स व चारचाकी वाहन असा एकूण दोन लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पडोली पोलीस स्टेशनच्या ठाणेदार व्ही. एम. ढाले, पोलीस कर्मचारी सुभाष कुळमेथे, अजय दरेकर, सुरेंद्र खनके, गजानन खुटेमाटे, शरदचंद्र कारुष, राकेश खैरे आदींनी केली.
पोलीस अधीक्षकांचे आॅपरेशन आॅलआऊट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 12:23 AM
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी मंगळवारी सायंकाळी शहरातील दारु विक्रेत्यांकडे छापे घातले. ऐनवेळी राबविण्यात आलेल्या मोहिमेमुळे दारुविक्रेत्यांची चांगलीच धावाधाव झाली. यावेळी सात विक्रेत्यांवर कारवाई करीत १२ जणांना अटक केली.
ठळक मुद्दे१२ जणांना अटक : मोठ्या प्रमाणात दारुसाठा जप्त