शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
2
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
3
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
4
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
5
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
6
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
7
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."
8
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
9
भारतात ईव्हीएम हवे की, बंद व्हावे? बघा सर्व्हे काय सांगतो?
10
"घरी ऐश्वर्या आराध्याची काळजी घेते म्हणूनच मी...", अभिषेक बच्चनचं वक्तव्य चर्चेत, म्हणाला- "पुरुषांमधला दोष हाच की..."
11
IND vs AUS: पर्थवर इतिहास रचण्यात टीम इंडिया 'यशस्वी'! ऑस्ट्रेलियाच्या बालेकिल्ल्यात 'विराट' विजय
12
आपल्यावर गुरुकृपा आहे किंवा होणार आहे हे कसे ओळखायचे? जाणून घ्या पूर्वसंकेत!
13
८०० जणांविरोधात एआयआर, ड्रोन फुटेजमधून घेतले फोटो, संभलमधील दंगेखोरांवर मोठ्या कारवाईची तयारी
14
Utpanna Ekadashi 2024: निर्मळ मनाने विष्णुभक्ती केली असता त्याचे अनपेक्षित फळ मिळते; कसे ते पहा!
15
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस होणार राज्याचे मुख्यमंत्री?; आजच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
16
'जानी दुश्मन'चा खेळ खल्लास! बुमराह-विराट यांच्यात दिसला 'मिले सुर मेरा तुम्हारा सीन' (VIDEO)
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
18
उत्पत्ति एकादशी: ६ राशींना उन्नती, यश-प्रगतीची संधी; श्रीविष्णूंची कृपादृष्टी, लाभच लाभ!
19
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
20
"...तर याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता"; रोहित पवारांच्या 'त्या' विधानावर अमोल मिटकरी भडकले

नव्या सरपंचांना गावविकासाची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 12:19 AM

तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये कॉंग्रेसचा बोलबाला दिसून आला. ९ पैकी ७ ग्रामपंचायतींवर कॉंग्रेसचे समर्थक सरपंचपदी निवडून आले आहेत.

ठळक मुद्देतालुक्यातील ९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये कॉंग्रेसचा बोलबाला दिसून आला.

लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये कॉंग्रेसचा बोलबाला दिसून आला. ९ पैकी ७ ग्रामपंचायतींवर कॉंग्रेसचे समर्थक सरपंचपदी निवडून आले आहेत. तर भाजपा व शेतकरी संघटना समर्थकांच्या वाट्याला प्रत्येकी १ ग्रामपंचायत आली. निकालानंतर अजुनही दावे-प्रतिदावे सुरू आहेत. पण, विकासकामांचा अनुशेष शिल्लक असलेल्या या तालुक्यात थेट निवडणुकीत विजयी झालेल्या सरपंचांना आता सामर्थ्याने निधी आणून मूलभूत गावसुधारणा करण्याची संधी मिळाली आहे.कॉंग्रेसने राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात, भाजपाने आमदार संजय धोटे यांच्या नेतृत्वात तर शेतकरी संघटनेने माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांच्या नेतृत्वात या निवडणुका लढविल्या होत्या. कॉंग्रेस समर्थकांनी ९ पैकी अंतरगाव, विरूर (गाडे.), निमणी, बाखर्डी, माथा, कोडशी, कुकुडसाथ या ७ ग्रामपंचायतींवर निर्विवाद वर्चस्व प्राप्त केले. कवठाला ग्रामपंचायत शेतकरी संघटनेकडे तर येरगव्हान ग्रामपंचायतीवर भाजपाच्या समर्थकांनी सत्ता काबीज केली. ७ सदस्यीय माथा ग्रामपंचायतमध्ये सदस्यपदासाठी कॉंग्रेस समर्थक ३, भाजपा समर्थक २ व शेतकरी संघटना २ असे पक्षीय बलाबल आहे. सरपंचपदाच्या तिरंगी लढतीत कॉंग्रेस समर्थक कामानंद ठाकरे यांनी संघटनेच्या रमेश खाडे व भाजपा समर्थक शशिकांत आडकीने यांचा प्रभाव केला. ९ सदस्यीय अंतरगाव ग्रामपंचायतमध्ये कॉंग्रेस समर्थक ६, भाजपा २ व शेतकरी संघटना १ असे पक्षीय बलाबल आहे. सरपंचपदाच्या निवडणुकीत कॉंग्रेस समर्थक सरिता पोडे यांनी संघटनेच्या रंजना वडस्कर यांनी यांचा पराभव केला. कुकुडसाथ ग्रामपंचायतमध्ये वंदना याश्वान चावले विजयी झाल्या असून तिरंगी लढतीत त्यांनी शेतकरी संघटनेच्या ममता गेडाम व भाजपाच्या कल्पना ठाकरे यांचा पराभव केला. ९ सदस्यीय बाखर्डी ग्रामपंचायतमध्ये कॉंग्रेस,४, भाजपा, ३ व शेतकरी संघटना, २ असे पक्षीय बलाबल असून सरपंच पदाच्या तिरंगी निवडणुकीत संघटनेच्या भाग्यश्री अरुण रागीट व भाजपा समर्थक रंजना काकडे यांचा पराभव केला. ९ सदस्यीय कवठाला ग्रामपंचायतध्ये ७ शेतकरी संघटना तर २ कॉंग्रेसचे उमेदवार निवडून आले असून सरपंच पदासाठी संघटनेच्या नरेश सातपुते यांनी कॉंग्रेसच्या देवराव ठावरी यांचा पराभव केला. ९ सदस्यीय येरगव्हान ग्रामपंचायतमध्ये कॉंग्रेस ४, भाजपा समर्थक ५ असे पक्षीय बलाबल आहे. सरपंचपदासाठी भाजपच्या सत्यवान आत्राम यांनी कॉंग्रेसच्या श्रीराम आत्राम यांचा पराभव केला. कोडशी कॉंग्रेस ७ व शेतकरी संघटना २ असे पक्षीय बलाबल असून सरपंचपदासाठी कॉंग्रेसच्या गिरजाबाई केराम यांनी शेतकरी संघटनेच्या अंजू गेडाम यांचा पराभव केला. ९ सदस्यीय निमणी ग्रामपंचायतमध्ये सर्व सदस्य कॉंग्रेसचे निवडून आले. तिरंगी लढतीत सरपंचपदासाठी कॉंग्रेस समर्थक सीमा शुद्धोधन जगताप यांनी शेतकरी संघटनेच्या शुभांगी शुक्राचार्य देठे व भाजपा समर्थक शिल्पा सुनील जगताप यांचा पराभव केला. कुकुडसाथ ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सदस्यपदासाठी पंचायत समितीचे माजी उपसभापती मनोहर नैताम मैदानात होते. शेतकरी संघटनेचे समर्थक कैलाश निळकंठ कोरंगे यांनी पराभव केला. तालुक्यात शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पानिपत झाले असून खातेही उघडता आले नाही.