शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
3
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
4
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
5
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
6
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
7
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
8
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
9
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
10
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
11
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
12
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
13
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
14
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
15
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
16
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
18
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
19
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
20
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...

मनपात विरोधक व सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 10:50 PM

शहरात विविध चौकांमध्ये पुतळे उभारणे, मुख्य मार्गावरील रस्ते रूंदीकरणासाठी फुटपाथ तोडून नव्याने बांधणे आणि शहरातील अनेक भागात प्रलंबित असलेले गुंठेवारी प्रकरण आणि रिंगरोड संदर्भातील विषयांवर मंगळवारी पार पडलेल्या चंद्रपूर महानगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत विरोधक आणि सत्ताधारी गटामध्ये चांगलीच खडाजंगी झाली.

ठळक मुद्देआमसभा गाजली : मनपा सभागृहाला राणी हिराईचे नाव

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरात विविध चौकांमध्ये पुतळे उभारणे, मुख्य मार्गावरील रस्ते रूंदीकरणासाठी फुटपाथ तोडून नव्याने बांधणे आणि शहरातील अनेक भागात प्रलंबित असलेले गुंठेवारी प्रकरण आणि रिंगरोड संदर्भातील विषयांवर मंगळवारी पार पडलेल्या चंद्रपूर महानगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत विरोधक आणि सत्ताधारी गटामध्ये चांगलीच खडाजंगी झाली. विरोधक आणि महापौर अंजली घोटेकर यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक उडाली. विरोधी बाकारील नगरसेवक पप्पू देशमूख, दीपक जयस्वाल, अनिल रामटेके, स्नेहल रामटेके, अमजद , सुनिता लोढीया आदी नरगसेवकांनी महापौर अंजली घोटेकर यांना विविध विषयावर प्रश्न विचारून धारेवर धरण्याचा प्रयत्न केला मात्र सत्तारूढ गटातील नगरसवेकांनी महापौरांची बाजू सावरून धरली असली तरी आमसभेत विविध प्रश्नांवर चांगलाच गदारोळ झाला.आमसभेला प्रारंभी नवनियुक्त समित्यांमधील सदस्याचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर शहरातील गांधी चौक ते जटपुरा गेट आणि जटपरा गेट ते कस्तूरबा चौक या दोन्ही मार्गाचा रूंदीकरणाचा प्रस्ताव चर्चेला येताच नगरसेवक दीपक जयस्वाल यांनी यावर आक्षेप घेत त्या रस्त्यालगती झाडे तोडणार काय असा प्रश्न विचारला. महापौर घोटेकर यांनी रस्ता रूंदीकरणासाठी आवश्यक असेल त्या ठिकाणचेच झाड परवानगीने तोडण्यात येतील सरसकट झाड तोडण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले. मनपा हद्दीतील रस्ते कामांसाठी वारंवार परमार नावाचेच वंष्ठत्राटदार कसे काय निविदा भरतात आणि गत तीन वर्षांपासून त्यांनाच कंत्राट मिळत आहे यावर जयस्वाल यांनी आक्षेप घेतला. शहराच्या वाढीव हद्दीबाबतचा प्रश्न नगरसेवक पप्पू देशमूख यांनी उपस्थित केला व त्यासंदर्भात काढण्यात येत असलेल्या टेंडर प्रक्रीयेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह लावत यात घोळ होत असल्याचा आरोप केला.बाबूपेठ रेल्वे उड्डाणपूलाचे काम अंत्यत धिम्या गतीने सुरू असल्याचा आरोप बसपाचे गटनेते अनिल रामटेके यांनी केला. यावर महापौर घोटेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभगाला विचारणा करण्यात यावे, असे निर्देश आयुक्तांना दिले. बसपाचे गटनेते रामटेके व शिवेसेनेचे सुरेश पचारे हे दोघेही मागच्या बाकावर बसले होते. त्यामुळे पचारे यांनी गटनेत्यांना सभागृहात बसण्यासाठी ठिकाण आहे की नाही असा प्रश्न उपस्थित करताच सभागृहात चांगलाच हशा पिकला. हा गंमतीचा भाग वगळता महापौरांनी प्रशासनाला पुढील सभेत गटनेत्यांसाठी बसण्यासाठी त्यांच्या नावाच्या पाट्या ठेवण्याच्या सूचना आयुक्तांना दिल्या.चंद्रपूर शहरावर गोंड राजाचे राज्य होते. आदीवासी असलेल्यांच्या शूरविरांचे शहरात पुतळे उभारण्या यावे असा प्रस्ताव चचेर्ला आला असता त्यावर प्रचंड गदारोळ झाला. महापौरांनी तर आज सकाळीच आपल्याला एका आदिवासी नेत्याने फोन करून शहरात आदिवासी शूरविरांचे पुतळे उभारा, अशी धमकीवजा ताकीद दिल्याचे सभागृहात सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याचा ठराव का चर्चेत का आणण्यात आला नाही, यावरही चांगलाच गदारोळ झाला. या विषयाला अनुसरूनच महापौर घोटेकर यांनी राणी हिराई यांचे नाव चंद्रपूर मनपातील सभागृहाला देण्यात यावे, असा ठराव मांडला. या ठराला सर्वांनी एकमताने मंजुरी दिली. जिल्हास्तरीय अल्पासंख्यांक समितीवर मनपाकडून एक सदस्य नामनिर्देशित करावयाचे असल्याने आजच्या सभेत महापोर अंजली घोटेकर यांनी नगरसेवक रवी आसवाणी यांचे नाव घोषित केले. मात्र विरोधकांनी अल्पसंख्यांकमध्ये कोणकोणत्या धर्माचा समावेश आहे, हे सांगावे असे सूचित करताच आसवाणी यांच्या नावाला विरोध झाला. अखेर गटनेत्यांनी आपल्याकडील अल्पसंख्याक सदस्यांची नावे द्यावीत त्यावर कागदपत्रे तपासणीअंती कोणाचे नाव निश्चित करायचे हे ठरविले जाईल, असा निर्णय घेतला.रिंगरोडवरून नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमकचंद्रपूर शहरासाठी हॉटेल ट्रायस्टार ते मूल मार्गावरील एमइएल चौकापर्यंत ५६० कोटी रूपयांचा नवा उड्डाणपूल प्रस्तावित असल्यामुळे यापूर्वी हॉटेल ट्रायस्टार पासून प्रस्तावित केलेला रिंगरोडचा विषय रद्द करण्यात यावा, अशी मागणी भाजपाचे नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांनी केली. यावर काँग्रेसचे नगरसेवक नंदू नागरकर, सुनिता लोढीया यांनी आक्षेप घेत कडाडून विरोध करीत महापौरांच्या आसनाकडे धावून गेले. भाजपाचे नगरसेवक संदीप आवारी यांनी नंदू नागरकर यांना पकडून ठेवले तर सविता कांबळे आणि सुनिता लोढीया यांच्यात शब्दिक चकमक उडाली.दूषित पाण्याची बाटली सभागृहातइंदिरानगर भागातील नगरसेवक अजमद यांनी चक्क दूषित पाण्याने भरलेली बॉटलच सभागृहाला दाखवून पाणी पुरवठ्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर महापौरांनी सदर दूषित पाणी कुठलेही आणले असाल असा शेरा मारत खिल्ली उडविली तर अजय सरकार यांनी पाणी पुरवठा करणाºया उज्ज्वल कंस्ट्रक्शन कंपनीने लिकेज झालेली पाईप लाईन दुरूस्त केल्याचे सांगितले. विरोधक मात्र या कंपनीच्या विरोधात ओरडत होते.