जिल्ह्यासाठी योग्य ठिकाण निवडावे : राजकारणापोटी अन्य ठिकाणावर अन्यायब्रह्मपुरी : शासनाने नवीन जिल्हे निर्माण करण्याचा प्रस्ताव मागितला आहे. त्या आधारे नवीन जिल्हे निर्माण करण्याची घोषणा बळावली आहे. चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करावयाचे झाल्यास ब्रह्मपुरी अथवा नागभीड हेच ठिकाण जिल्हा निर्मितीसाठी योग्य आहेत. या व्यतिरिक्त अन्य ठिकाण जिल्हा म्हणून घोषित झाल्यास ब्रह्मपुरी, नागभीडकरांचा प्रचंड विरोध असल्याचा सूर नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.ब्रह्मपुरी जिल्ह्याची मागणी १९८२ पासूनची आहे. संयुक्त चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करताना ब्रह्मपुरी व गडचिरोली असे दोन ठिकाणे प्रमुख होती. परंतु त्यावेळसही ब्रह्मपुरीला हुलकावणी देऊन गडचिरोली जिल्हा बनविण्यात आला. परंतु त्यानंतरही ब्रह्मपुरी जिल्ह्याची मागणी कायम आहे. ब्रह्मपुरी हे ठिकाण जिल्हा निर्मितीसाठी अनुकूल आहे. भौगोलिक संपदा, दळणवळण व्यवस्था, शासकीय इमारती व जागा व अन्य बाबीनी सर्वसमावेशक स्थळ असल्याने शासनाने सर्व बाबी तपासून योग्य तो ठिकाण जिल्ह्यासाठी निवडणे महत्त्वाचे आहे. याशिवाय नागभीड हे मध्यवर्ती ठिकाण आहे. ब्रह्मपुरी, नागभीड, पवनी आदींसाठी ते महत्त्वाचे ठिकाण आहे. ब्रह्मपुरीकडे प्रवास नागभीडवरुन सुरु करावा लागतो. तर नागभीडकरांना काही सेवासाठी ब्रह्मपुरीला जावे लागते. त्यामुळे ब्रह्मपुरी, नागभीड ही दोन्ही स्थळे परस्पराशी जुळल्या गेली आहेत. अशाही परिस्थितीत या दोन्ही स्थळांचा विचार करुन अन्य तिसरेच स्थळ जिल्हा निर्मितीसाठी घोषित करण्यात आले तर जवळजवळ ५० हजार लोकांच्या भावनांचा अनादर होईल.शासनाला केवळ राजकारण पोटी खुश करायचे असेल तर ज्यानी विश्वास ठेवला असेल त्यांच्याशी अविश्वासाने शासन वागले, असा अर्थ काढून त्याचा उलट परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक नागरिकांच्या भावना लक्षात घेतल्यास असे निर्दक्षणास आले आहे की, ब्रह्मपुरीकरांनी नागभीडला पसंती तर नागभीडकरांनी ब्रह्मपुरीला पसंती दर्शविलेली आहे. जर हे दोन्ही ठिकाणे जिल्हा निर्मितीसाठी विचारात घेतली जात नसतील तर सद्या:स्थितीत चंद्रपूर हेच ठिकाण जिल्हास्थान म्हणून सोयीचे असल्याच्या भावना व्यक्त होताना दिसून येत आहेत. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या विभाजनाची वेळ आली तर ब्रह्मपुरी किंवा नागभीड हे दोन ठिकाणापैकी एक ठिकाण विचारात होऊनच घोषित करण्यात यावे, असा मोठा सूर नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.(तालुका प्रतिनिधी)राजकारण सोडून लोकचळवळ महत्त्वाचीएरव्ही नाही त्या ठिकाणी राजकारण केले जात असते. परंतु या प्रमुख मागणीसाठी राजकारण बाजूला ठेवून प्रत्येकांनी लोकांचा सहभाग वाढविण्याचा प्रयत्न करुन लोकचळवळ मोठी करुन मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्याची आज खरी गज आहे. हवेदावे, एकमेकांना एक दुसरा न घालणे किंवा उटावरुन शेळ्या हाकलने आदी प्रकार सोडून हृदयातून लोकांचा सहभाग जमवण्याचे पहिल्यांदा कार्य सुरू करण्याचा ही सूर सामान्यांकडून व्यक्त केला जात आहे.ब्रह्मपुरी जिल्ह्याची मागणी जुनी आहे. सर्व परिस्थिती अनुकूल आहे. त्यामुळे ब्रह्मपुरी जिल्हा घोषित करणे हे सर्व स्तराच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणारे आसेल.- साकेत भानारकर, ब्रह्मपुरीनागभीड हे मध्यवर्ती ठिकाण आहे व ब्रह्मपुरीला जाणे येणे सोईचे आहे. त्यामुळे विभाजनाच्या संदर्भात दोन पैकी एकाचा विचारा करावा.- प्रा. डॉ. मोहन जगनाडे, नागभीड
अन्य जिल्हा निर्मितीला ब्रह्मपुरी, नागभीडकरांचा विरोध
By admin | Published: July 03, 2016 1:07 AM