आॅनलाईन लोकमतचंदनखेडा : भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथे सांसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत दोन दिवसीय सेंद्रिय शेती कृषक कार्यशाळा नुकतीच पार पडली. या कार्यक्रमाचे आयोजन भारत सरकारच्या कृषी तथा किसान कल्याण मंत्रालयाचे क्षेत्रीय जैविक शेती केंद्र नागपूरच्या वतीने करण्यात आले होते.सेंद्रीय शेती कार्यशाळेचे उद्घाटन कृषी व पशु संवर्धन सभापती अर्चना जीवतोडे यांच्या हस्ते पार पडले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. सदस्य मारोती गायकवाड तर प्रमुख पाहुणे म्हणून नरेंद्र जीवतोडे, निलकंठ पराते, चंद्रकांत गुप्ते आदी उपस्थित होते. कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी मधुकर संबा कोडापे, वायगाव या शेतकºयाच्या शेतीची निवड करून त्यांच्या शेतात पालापाचोळा, शेतातील वाया जाणाऱ्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्माण करण्याचे प्रात्यक्षिक क्षेत्रीय संचालक डॉ. अजयसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनामध्ये दाखविण्यात आले.दुसºया सत्रात निवृत्त प्राचार्य डॉ. पालारपवार यांनी सेंद्रीय शेती करताना जैविक खते कोणती वापरावी, मायकोन्युटीयन्ट कोणते द्यायचे, सेंद्रीय शेतीसाठी बीज प्रक्रिया कशी करायची, शेतातील धसकटे व पालापाचोळ्यापासून सेंद्रीय खते निर्माण करण्याची पद्धत यावर मार्गदर्शन केले. तर सेंद्रीय जैविक शेती केंद्राचे क्षेत्रीय संचालक डॉ. अजयसिंग राजपूत यांनी जिवाणू संवर्धक वापर करून खत निर्मितीबाबत मार्गदर्शन केले.कार्यशाळेचे संचालन यशवंत सायरे यांनी केले. या कार्यशाळेत शैलेश नक्षिणे, महेश रामटेके, नितीन टोंगे, बालाजी धोबे, आशिष रोकडे, निखिल पराते, संदीप कुरेकार, पराते तसेच भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा, सागरा, वायगाव, पारोधी, शेगाव खुर्द परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चंदनखेडा येथे सेंद्रिय शेती कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 12:18 AM
भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथे सांसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत दोन दिवसीय सेंद्रिय शेती कृषक कार्यशाळा नुकतीच पार पडली.
ठळक मुद्देकंपोस्ट खताचे प्रात्यक्षिक : अनेक शेतकऱ्यांची उपस्थिती