शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

सिंदेवाहीत कृषी विद्यापीठ उभारावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 11:23 PM

पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांच्या हितासाठी सिंदेवाही येथे कृषी विद्यापीठ उभारावे, अशी मागणी सर्वपक्षीय कृती समितीने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांकडे एका निवेदनातून केली आहे.

ठळक मुद्देकृती समितीची मागणी : तहसीलदारांना दिले निवेदन

आॅनलाईन लोकमतसिंदेवाही : पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांच्या हितासाठी सिंदेवाही येथे कृषी विद्यापीठ उभारावे, अशी मागणी सर्वपक्षीय कृती समितीने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांकडे एका निवेदनातून केली आहे.अकोला येथील डॉ. पंजाबराव कृषी विद्यापिठाचे विभाजन करून पूर्व विदर्भातील जिल्ह्यांसाठी नवीन कृषी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी शासनाने डॉ. वाय. एस. थोरात व डॉ. व्यंकटेश्वरलू समिती गठित केली होती. या समितीने सरकारला अहवाल सादर केला. सिंदेवाही येथे १९११ मध्ये ऊस व भात संशोधन केंद्र सुरू आहे. येथील केंद्राकडे २०० हेक्टर शेतजमीन उपलब्ध आहे.पूर्व विदर्भ विभागाकरिता १९८४ पासून विभागीय कृषी संशोधन केंद्र सुरू असून सिंदेवाही, साकोली, नवेगाव, आमगाव व सोनापूर येथील कृषी संशोधन केंद्राचा समावेश आहे. २००४ पासून सिंदेवाही येथे कृषी विज्ञान केंद्र सरू झाले. कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्षेत्र चंद्रपूर जिल्हा निश्चित करण्यात आला आहे. नवीन कृषी विद्यापीठ स्थापन करण्याकरिता आवश्यक शेतजमीन, कार्यालयीन इमारत, निवासस्थान, शेतकरी भवन सभागृह, वसतिगृह आणि येथे गोदात उपलब्ध आहेत. नव्या इमारती बांधण्याची गरज नसल्याने शासनाचे ५०० कोटी रुपये बचत होवू शकतात. सिंदेवाही हे शहर बल्लारपूर ते गोंदिया रेल्वे मार्गाला जोडले आहे. तसेच चंद्रपूर-नागपूर चिमूर- गडचिरोली महामार्गाशी संबंधित आहे.कृषी विद्यापीठाकरिता सर्वदृष्टीने अनुकूल स्थिती असल्याने राज्य शासनाने सिंदेवाही येथे कृषी विद्यापीठ उभारावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे.निवेदन देताना सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष मनोहर पवार, हनुमंत बोरकर, मयूर सूचक, ऋषी मानकर, कैलास टहलियानी, किशोर मेश्राम, सतीश सहारकर, रमेश पित्तुलवार, हिरालाल इंदोरकर, श्रीधर बन्सोड, अशोक सागरे, जावेद खा पठाण, अरविंद देवतळे उपस्थित होते.