वरोरा : विश्व मल्लखांब दिनाच्या निमित्ताने महारोगी सेवा समिती संचलित आनंद निकेतन महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाने ऑनलाईन चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा १२ ते १५ जून या चार दिवसांच्या कालावधीमध्ये घेण्यात आली.
या स्पर्धेसाठी राज्यातूनच नव्हे, तर संपूर्ण देशभरातून स्पर्धक सहभागी झाले. या स्पर्धेत १०० स्पर्धक सहभागी झाले होते. ही चित्रकला स्पर्धा मल्लखांब व तत्संबंधी खेळ या विषयावर आधारित होती. स्पर्धेत प्रथम क्रमांक टीना भाऊराव काळे हिने पटकाविला. तसेच पूनम बन या मुलीने द्वितीय, तर तृतीय क्रमांक सिद्धी संतोष आवळे यांनी पटकाविला. संपूर्ण स्पर्धेचे आयोजन बी. एस्सी. द्वितीय वर्षाचा विद्यार्थी कुणाल दातरकर याच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयातील सर्व मल्लखांब खेळाडूंनी केले.
===Photopath===
180621\img-20210616-wa0086.jpg
===Caption===
warora