बल्लारपूर : बामणी येथे २६ व २७ रोजी राष्ट्रीय ग्राम स्वराज योजनेंतर्गत ‘आमचा गाव, आमचा विकास’ या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा पार पडली. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी बामणीचे सरपंच सुभाष ताजने होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य ॲड.हरीश गेडाम, माजी सभापती गोविंदा पोडे, प्रशिक्षक प्रवीण, कृषी विकास अधिकारी विलास ताजने, यशदा पुणेचे जिल्हा प्रशिक्षक संदीप सुखदेवे, उपसरपंच शेख जमील, ग्रामविकास अधिकारी लक्ष्मण शेंडे उपस्थित होते. ग्रामपंचायतीचा लोकसहभाग, ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने आमचा गाव आमचा विकास हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राज्य शासनाने हाती घेतला आहे. ग्रामीण भागाच्या विकासासोबत ग्रामपंचायती अधिक सक्षम बनविणाऱ्या या योजनेंतर्गत आमचा गाव आमचा विकास हा उपक्रम निश्चितच यशस्वी होईल व गावाचे रूप पालटण्यास मोलाची मदत होईल, अशी माहिती संदीप सुखदेवे यांनी यावेळी दिली. कार्यशाळेत बामणी, दहेली, लावारी, कळमना, येथील सर्व संसाधन गटाच्या सदस्यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन व आभार ग्रामविकास अधिकारी लक्ष्मण शेंडे यांनी केले. कार्यशाळेत ग्रामपंचायत सदस्य वर्षा आलाम, दिलीप काटोले, कमलाबाई कोडापे, संतोष टेकाम, सुरेखा मडावी, आशाताई निकोडे, श्रीहरी अंचुर, स्वप्निल बोरकर, कौशल्याबाई पेंदोर, चंदू घाटे, सुशिलाबाई कुलसंगे, सुरेखा निब्रड व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
‘आमचा गाव, आमचा विकास’ गणस्तरीय कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2021 4:31 AM