लोकमत न्यूज नेटवर्कमूल : तालुक्यातील चिरोली येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. मात्र या ठिकाणी डॉक्टर व कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने चिरोलीतील प्राथमिक आरोग्य केंद्र वाऱ्यावर सुरू आहे. यामुळे आलेल्या रूग्णांना तालुक्याच्या ठिकाणी जाऊन महागडा उपचार घ्यावा लागत आहे.प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व कर्मचाºयांना मुख्यालयी राहण्याचे आदेश देण्यात यावे, अशी मागणी चिरोलीच्या सरपंच तथा रूग्णकल्याण समितीच्या सदस्य कविता सुरमवार यांनी केली आहे. तालुक्यातील चिरोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ९० टक्के पदे भरण्यात आलेली आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रायपूरे यांची भगवानपूर येथील उपकेंद्राचा अतिरीक्त कारभार असल्याने ते भगवानपूर आणि चिरोली येथील आरोग्य केंद्राचा कारभार पाहतात. या ठिकाणी डॉ. आयलनवार आणि डॉ. मेश्राम यांची नियुक्ती करण्यात आली. परंतु, डॉ. मेश्राम यांना मारोडा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आल्याने याठिकाणी डॉ. रायपूरे आणि डॉ. आयलनवार हे प्राथमिक आरोग्य केंद्रात आलेल्या रूग्णावर उपचार करीत आहेत. चिरोली व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने चिरोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येत असतात. परंतु, याठिकाणी डॉक्टर व कर्मचारी राहत नसल्याने रूग्णांची हेळसांड होत आहे.चिरोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना नेहमीच प्रतिनियुक्तीवर बाहेर पाठविल्या जात असल्याने व येथे कार्यरत डॉक्टर मुख्यालयी राहत नसल्याने रात्री आलेल्या रूग्णांना उपचाराविना आल्यापावली परत जावे लागत आहे. हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू असून याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.योजनांचा लाभ द्याप्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश द्यावे. शासन आरोग्यासाठी लाखोंचा खर्च करीत असतानाही याचा लाभ मिळत नसल्याने रोष पसरला आहे.
चिरोली आरोग्य केंद्राचे डॉक्टर मुख्यालयाबाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 10:40 PM
तालुक्यातील चिरोली येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. मात्र या ठिकाणी डॉक्टर व कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने चिरोलीतील प्राथमिक आरोग्य केंद्र वाऱ्यावर सुरू आहे. यामुळे आलेल्या रूग्णांना तालुक्याच्या ठिकाणी जाऊन महागडा उपचार घ्यावा लागत आहे.
ठळक मुद्देरूग्णांचे हाल : वरिष्ठांनी लक्ष द्यावे