शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

नाला बुजवून ले-आऊटधारकांनी केला नियमबाह्य रस्ता

By admin | Published: July 12, 2014 11:34 PM

राजुरा शहरात अनेक कामे नियमबाह्य असून शासकीय अधिकारी कुठेच कारवाई करताना दिसत नाही. ही अत्यंत गंभीर बाब आहे. शहरातील भारत चौक परिसरातील नाला बुजवून ले-आऊटकडे जाण्यासाठी

राजुरा : राजुरा शहरात अनेक कामे नियमबाह्य असून शासकीय अधिकारी कुठेच कारवाई करताना दिसत नाही. ही अत्यंत गंभीर बाब आहे. शहरातील भारत चौक परिसरातील नाला बुजवून ले-आऊटकडे जाण्यासाठी रस्ता तयार केला. कुठलीही परवानगी नाही. ही दबंगशाही राजुरा शहरात मोठ्या प्रमाणात सुरू असून आता चक्क नाला बुजविला जातो. तहसील कार्यालयाचे अधिकारी मात्र या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करीत आहे. एखादा गरीब जमिनीवर घर बांधतो. त्याला नोटीस बजावली जाते. दुसरीकडे नाला बुजविला जातो. परंतु शासकीय यंत्रणेला माहीत होत नाही. याचा अर्थ शासकीय अधिकारी कुठेतरी मॅनेज झाल्याचे दिसून येते. या प्रमाणेच सर्वे क्रमांक १४९ मध्ये तर हिंदु समाज आणि मुस्लीम समाजाच्या स्मशानभूमीतून रस्ता तयार केला. एवढयावरच थांबले नाही तर ले-आऊटधारकांनी नाल्यावरच पूल बांधून टाकला. बिना परवानगीने असा प्रकार सुरू आहे. कुणी शासकीय जमिनी हडपत आहे, कुणी शासकीय जमिनीवर पूल बांधत आहे, कुणी वाहता नाला थांबवून तो माती टाकून बुजवून टाकून ले-आऊटकडे जाण्याचा रस्ता तयार करीत आहे. ही बाब गंभीर असताना याकडे लक्ष पुरविण्यासाठी कुणीही धजत नाही. शासकीय जमिनीवर ले-आऊटधारक सर्रासपणे आपल्या सोईसाठी काहीही करीत असून येथील तहसीलदार, उपविभागीय अधिकारी मात्र चुप बसले आहे. राजुरा शहरातील सर्वे क्र. १४९ मध्ये शासकीय जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असून या जमिनीवर तहसिलदारापासून तर अनेक शासकीय-निमशासकीय अधिकाऱ्यांचेच अतिक्रमण आहे. याठिकाणी रस्ते झाले, विद्युत आली, हा गोरखधंदा मागील दहा वर्षापासून राजरोसपणे सुरू आहे. परंतु येथील जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कुठलीच दखल घेतली जात नाही. स्मशानभूमीतून रस्ता झाल्यामुळे याठिकाणी अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. राजुरा शहरात भारत चौकातील नाला बुजविल्यामुळे आणि ले-आऊटधारकांनी मातीचे ढिगारे टाकल्यामुळे भारत चौक परिसरात पावसाळ्यात बँक वॉटरमुळे अनेक घरे पाण्याखाली येण्याची शक्यता आहे. चक्क नाल्याला लागूनच काही ले-आऊट तयार होत आहे. (शहर प्रतिनिधी)